जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध वाळू प्रकरण,२०.७० लाखांचा ऐवज जप्त 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात सरकारी वाळूचे ६०० रुपये ब्रास हे नागरिकांसाठी दिवास्वप्न ठरलेले असताना अवैध वाळू वाल्यांची चांदी होत असून त्यांनी अव्वाच्या सव्वा दराने वाळूउचल सुरूच ठेवली असून या प्रकरणी अशाच एका प्रकरणाचा नगर येथील स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने तपास लावला असून त्यात आरोपी प्रज्वल शरद भालेराव व महेश जगन्नाथ म्हस्के आदी दोन आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठण्यात गुन्हा दाखल केल्याने वाळूचोरांत दहशत बसली आहे.

संकल्पित छायाचित्र.

गत ०१ मे रोजी राज्याच्या महसूल मंत्र्यांनी ६०० रुपयांना एक ब्रास वाळूचे स्वप्न दाखवले होते त्यास दहा पाच महिने उलटूनही एक ब्रास वाळू तालुक्यातील नागरिकांना मिळालेली नाही.सुरेगावात एक वाळू डेपो तयार केल्याच्या बातम्या आहेत मात्र त्याचे उदघाटन होता होता राहून गेले आहे.त्यामुळे इच्छुक बांधकाम व्यावसायिक व घरमालक यांना वाळू मिळेनासी झाल्याने त्यांनी आपली बंद पडलेली बांधकामे सुरु करण्यासाठी चढ्या दराने वाळू  उचलण्यास सुरुवात केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून ती वडगाव या ठिकाणी तालुक्यात प्रवेश करते.त्या ठिकाणाहून ते वारी हद्दीतून ती राहाता तालुक्यात व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते.संबंधित ठिकाणी वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तत्कालीन खा.स्व.शंकरराव काळें यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता.न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.व सरकारचा बुडणारा महसूल पुन्हा वसूल करण्यास परवानगी द्यावी लागली होती.मागावुन तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले तालुक्यातील राजकीय नेते यांनीही या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी दाखवून दिली असल्याचे उघड झाल्याची घटना फार जुनी नाही.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पहात नाही.

गत ०१ मे रोजी राज्याच्या महसूल मंत्र्यांनी नागरिकांसाठी ६०० रुपयांना एक ब्रास वाळूचे स्वप्न दाखवले होते त्यास दहा पाच महिने उलटूनही एक ब्रास वाळू तालुक्यातील नागरिकांना मिळालेली नाही.सुरेगावात एक वाळू डेपो तयार केल्याच्या बातम्या आहेत मात्र त्याचे उदघाटन होता होता राहून गेले आहे.त्यामुळे इच्छुक बांधकाम व्यावसायिक व घरमालक यांना वाळू मिळेनासी झाल्याने त्यांनी आपली बंद पडलेली बांधकामे सुरु करण्यासाठी चढ्या दराने वाळू  उचलण्यास सुरुवात केली आहे.त्याचा फायदा वाळूचोरांनी उचलला आहे.त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे त्याकडे स्थानिक गुन्हे शाखेने याबाबत मात्र आपले लक्ष घातले असून त्यांना मिळालेल्या माहिती नुसार त्यांनी नूकत्याच टाकलेल्या धाडीत धारणगाव रस्त्यालगत सायंकाळी ४.१० वाजेच्या सूमारास एक निळ्या रंगाचा विना क्रमांकाचा दहा टायरचा सात ब्रास अवैध वाळूसह हायवा डंपर पकडला असून त्याची किंमत २० लाख ७० हजार रुपये असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.त्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनस्थळी पोलीस निरीक्षक देशमुख यांनी भेट दिली आहे.

दरम्यान या आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४८१/२०२३ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.के.ए.जाधव हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close