कोपरगाव तालुका
कोपरगावात काँग्रेस तालुकाध्यक्षांस हटविण्याची तयारी सुरु !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात तीन पक्षाचे सरकार आत्ताच कुठे चालण्यास नव्हे तर रांगण्यास सुरुवात झालीय असताना कोपरगाव तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षांच्या खुर्चीस सुरुंग लावण्यास प्रारंभ झाला असल्याची धक्कादायक माहिती हाती आल्याने कोपरगाव तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक होण्याच्या आधी देशात सत्तरहून अधिक वर्ष देशभरात सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस पक्षाचे वाईट दिवस सुरु होते.हा पक्ष पुन्हा उठून उभा राहील कि नाही.याची सर्वानाच चिंता लागून होती.या पक्षाने लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यावर या पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे राजीनामा देऊन मोकळे झाले होते व आपल्या पदापासून परदेशात पळ काढत होते. त्यांनतर त्यांनी अद्याप आपला पदभार संभाळलेला नाही.वर्तमानात प्रभारी अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधीच हा पक्ष चालवत आहे.इतकी विदारक स्थिती या पक्षाची झाली होती.त्यामुळे या बुडत्या जहाजातून बाहेर पडण्यासाठीच सर्वांची “पळे-पळे कोण पुढे पळे तो”ची स्पर्धा सुरु होती.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,राज्यात विधानसभा निवडणूक होण्याच्या आधी देशात सत्तरहून अधिक वर्ष देशभरात सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस पक्षाचे वाईट दिवस सुरु होते.हा पक्ष पुन्हा उठून उभा राहील कि नाही.याची सर्वानाच चिंता लागून होती.या पक्षाने लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यावर या पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे राजीनामा देऊन मोकळे झाले होते व आपल्या पदापासून परदेशात पळ काढत होते. त्यांनतर त्यांनी अद्याप आपला पदभार संभाळलेला नाही.वर्तमानात प्रभारी अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधीच हा पक्ष चालवत आहे.इतकी विदारक स्थिती या पक्षाची झाली होती.त्यामुळे या बुडत्या जहाजातून बाहेर पडण्यासाठीच सर्वांची “पळे-पळे कोण पुढे पळे तो”ची स्पर्धा सुरु होती.ती मध्यप्रदेश व राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीनंतर थोडी सावरली होती.या परिस्थितीत अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन या जहाजातून बाहेर पडणे पसंत केले होते.
महाराष्ट्र राज्यात सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाआघाडीचे सरकार आल्यावर पुन्हा या पक्षाचा भाव वधारला आहे.मात्र या ही परिस्थिती काही निष्ठावान तरुणांनी मात्र या पक्षाचे पद स्वीकारून मोठे आव्हान स्वीकारले होते त्यात कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी या पक्षाकडे ना कोणी फिरकत होते ना त्याचे सभासदत्व कोणी घेत होते अशा वेळी नितीन शिंदे यांना काही जेष्ठ काँग्रेस नेत्यांनी हि जबाबदारी घेण्याची विनंती केली व या तरुणाने ती लीलया स्वीकारली.अशा वेळी खरे तर या पक्षाने त्यांचे व त्यांच्या सारख्या तरुणांचे आभार मानायला हवे मात्र असे होईल तर तो काँग्रेस पक्ष कसला ?
राज्यात तर भाजपने विरोधी पक्षाचा नेताच आपल्या जाळ्यात अडकवला होता.मात्र महाराष्ट्र राज्यात सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाआघाडीचे सरकार आल्यावर पुन्हा या पक्षाचा भाव वधारला आहे.मात्र या ही परिस्थिती काही निष्ठावान तरुणांनी मात्र या पक्षाचे पद स्वीकारून मोठे आव्हान स्वीकारले होते त्यात कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी या पक्षाकडे ना कोणी फिरकत होते ना त्याचे सभासदत्व कोणी घेत होते अशा वेळी नितीन शिंदे यांना काही जेष्ठ काँग्रेस नेत्यांनी हि जबाबदारी घेण्याची विनंती केली व या तरुणाने ती लीलया स्वीकारली.अशा वेळी खरे तर या पक्षाने त्यांचे व त्यांच्या सारख्या तरुणांचे आभार मानायला हवे मात्र असे होईल तर तो काँग्रेस पक्ष कसला ? नेमके कोपरगावात हेच घडले आहे.राज्यात महाघडीचे सरकार आल्या-आल्या काहींना साई संस्थानचे तर काहींना महामंडळाचे स्वप्न पडायला लागले आहे.प्रतिकूल काळात कोणतेही पद घेण्यास नकार देणाऱ्यांनीं आता ज्यांनी हि पदे स्वीकारली त्यांना आता राजीनामा देण्यास भाग पाडायला किंवा ते पद सोडण्यास डावपेच आखण्यास प्रारंभ केला आहे.यात एक साई संस्थानचा माजी विश्वस्त आघाडीवर असल्याची माहिती आहे.बऱ्याबोलाने पदाचा राजीनामा दिला नाही तर त्या पदाधिकाऱ्यांशी कोणत्या ना कोणत्या कारणाने कुरापती करण्यास प्रारंभ केला असल्याने हे तरुण नाराज झाले आहे.आता या बाबत हि तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.आता वरिष्ठ नेते या पदाधिकाऱ्याबाबत कोणती भूमिका घेतात या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.