जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

रस्ते आणि पाणी प्रश्नावरून आ. काळेंचा जनता दरबार गाजला !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावचे नवनिर्वाचित आ. आशुतोष काळे यांनी आज सकाळी आयोजित केलेला जनता दरबार तालुक्यातील अत्यंत खराब रस्ते व महावितरण कंपनीच्या गलथानपणामुळे व गोदावरी कालव्यांची झालेली दुरवस्था या प्रश्नांनी गाजला असून तालुक्यात या समस्यांचा महापूर आलेला दिसला. त्यातून हा पहिलाच जनता दरबार असल्याने नागरिकांनी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी मोठी गर्दी केलेली दिसून आली. अखेर सुमारे चार तास चाललेला हा दरबार त्यांना आवरता घ्यावा लागला असून त्यांनी या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शहर व ग्रामीण भागासाठी पुन्हा स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची घोषणा करावी लागली आहे.

कोपरगावसह राज्याची विधानसभा निवडणूक संपन्न होऊन कोपरगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे अटीतटीच्या निवडणुकीत ८२२ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते.त्यानंतर राज्यात सरकार स्थापने साठी झालेला उशीर त्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार यात दोन महिन्याचा कालावधी जाऊन नमनालाच घडाभर तेल वाया गेल्याचे चित्र राज्यात तयार झाले आहे.त्यामुळे राज्यातील आमदारही या प्रक्रियेत अडकून पडले होते.त्यांना मतदार संघात वेळ देता आला नव्हता.आता कुठे त्यांना उसंत मिळाली असताना कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी दोन दिवसांपूर्वी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबाराची घोषणा केली होती.त्याप्रमाणे आज हा दरबार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी कोपरगाव शहरातील नागरिक व तालुक्यातील ग्रामस्थांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी तोबा गर्दी केलेली दिसून आली होती.त्यावेळी सर्वात जास्त प्रश्न व तक्रारी महावितरण कंपनीच्या व जसंपदा विभागाच्या गलथानपणा बाबत होत्या.

त्यावेळी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन,रोहिदास होन.कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन,संजय आगवन,कोपरगाव पालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत नागरे,नगरसेवक मेहमूद सय्यद,पंचायत समितीचे गटनेते अर्जुन काळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे, जिल्हा परिषदेचे उपअभियंता उत्तम पवार आदी प्रमुख मान्यवरांसह बहू संख्येने नागरिक उपस्थित होते.

त्यावेळी भाजपचे माजी सरचिटणीस राजेंद्र खिलारी,रावसाहेब टेके,रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप रणधीर,संजय खताळे, वैशाली आभाळे,जितेंद्र देठे,अशोक डुबे,कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक कारभारी आगवन,अरुण चंद्रे,भाऊसाहेब गव्हाणे आदींसह अनेकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.त्याला महावितरणचे अधिकारी श्री सोनवणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे,तहसीलदार योगेश चंद्रे,पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी उत्तरे दिली.अखेर वेळे अभावी आमदार काळे यांना आपला जनता दरबार आवरता घ्यावा लागला.मात्र जनतेच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे प्रथमच दिसून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close