जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समतानगरमध्ये गटारी करा अन्यथा आंदोलन-जाधव

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या समतानगर या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढूनही या भागात अद्याप गटारी,रस्ते,आदी पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही त्यामुळे या भागात डासांचे साम्राज्य निर्माण झाले असून रोगराईची साथ पसरली आहे त्यामुळे या भागात पालिकेने तातडीने पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्या अन्यथा या परिसरातील नागरिक उपोषणाला बसतील असा इशारा या भागातील कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे याना पाठविलेल्या निवेदनात नुकताच दिला आहे.

कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण दोन कि.मी.अंतरावर खडकी रस्त्यावर असलेल्या समतानागर या उपनगरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.मात्र त्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण व्हायला हव्या त्या झालेल्या नाही.त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून येत आहे.सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी आवश्यक आहे.सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने ते पाणी तेथेच साचून त्यावर सूक्ष्म जीवांची वाढ होऊन रोगराई निर्माण होत आहे.डासांची उत्पत्तीस्थळे मोठ्या प्रमाणात असल्याने त्यावर विविध प्रतिबंधक औषध फवारण्या होणे गरजेचे आहे मात्र आरोग्य विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.अनेकवेळा तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही.त्यामुळे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी या प्रश्नी ताबडतोब लक्ष घालून हि कामे मार्गी लावावी अन्यथा आपण कोपरगाव पालिकेसमोर उपोषण करू असा इशारा ज्ञानेश्वर जाधव यांनी दिला आहे.

निवेदनावर गणेश बिडवे,अशोक खंडीझोड,नरेश बडदे,यादवराव अभाळे,संतोष आंबोरे,उमेश गिरमे, मनीषा खंडीझोड,दमयंती माकोने, कारभारी जाधव,दत्तू पठाडे,विठ्ठलराव गायकवाड,चेतन वडगावकर आदींसह एकवीस नागरिकांच्या साह्य आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close