कोपरगाव तालुका
सुरेगाव येथील अपघातात तरुण ठार,पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील देर्डे-चांदवड येथील रहिवाशी व आदिवासी तरुण आकाश अरुण थोरात (वय-१८) रात्री सात वाजेच्या सुमारास कोळपेवाडी कडून चासनळी कडे आपल्या दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस दिलेल्या धडकेत तो जागीच ठार झाला आहे.या प्रकरणी अद्याप कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही.
अपघात घडल्या नंतर मयत तरुणांच्या सोबत असलेल्या महिलांनी त्या ठिकाणी दुचाकी गायब केली व त्या महिलाही गायब झाल्या होत्या.अपघात स्थळी अपघाताचा कोणताही पुरावा सोडला नाही.त्यांनी अपघातग्रस्त दुचाकीही गायब केली मात्र ती कोणत्या कारणाने गायब केली हे मात्र समजले नाही.त्यामुळे या अपघाताबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनाही माहिती देता आली नाही.दरम्यान घटनास्थळावरून या मयत इसमास रात्री आठ वाजेच्या सुमारास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.
सदर मयत युवक आकाश थोरात हा कोणत्या कामासाठी चास नळी कडे जात होता हे स्पष्ट झालेले नाही.दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या दुचाकीवर अन्य दोन महिला असल्याची माहिती आहे.मात्र अपघात घडल्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी दुचाकी गायब केली व त्या महिलाही गायब झाल्या होत्या.अपघात स्थळी अपघाताचा कोणताही पुरावा सोडला नाही.त्यांनी अपघातग्रस्त दुचाकीही गायब केली मात्र ती कोणत्या कारणाने गायब केली हे मात्र समजले नाही.त्यामुळे या अपघाताबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनाही माहिती देता आली नाही.दरम्यान घटनास्थळावरून या मयत इसमास रात्री आठ वाजेच्या सुमारास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते मात्र तेथे वैद्यकीय उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषीत केले आहे.दरम्यान आमच्या प्रतिनिधीने या बाबत देर्डे चांदवड येथे स्थानिक नागरिकांशी संपर्क स्थापित करून पहिला असता त्यांनाही या घटनेची खबर नव्हती.मात्र हा तरुण कोंबडवाडी येथील आदिवासी कुटुंबातील असल्याची माहिती हाती आली आहे.उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या बाबतची खबर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली होती.त्यावरून कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यु नोंद दप्तर क्रं.१/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री कुसारे हे करीत आहेत.