कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात दोघांकडून महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण वीस कि.मी.अंतरावर असलेल्या उक्कडगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या विठ्ठल गणपत निकम व त्याचा मुलगा गणेश विठ्ठल निकम यांनी आपल्या घरात दूरदर्शन पहात असलेल्या महिलेच्या घरात घुसून तिचा मिठी मारून विनयभंग केल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असेकी,कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ग्रामपंचायत हद्दीत वरील फिर्यादी महिला व आरोपी हे राहतात.नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी फिर्यादी महिला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आपल्या घरात आपल्या पलंगावर बसून दूरदर्शन संचावर कार्यक्रम पाहत असताना त्यावेळी आरोपी विठ्ठल निकम व त्याचा मुलगा गणेश निकम हे आले व त्यातील विठ्ठल निकम हा फिर्यादी महिलेस म्हणाला कि,”तू माझ्या मुलाला काय सांगितले ?”असे म्हणून फिर्यादी महिला आपल्या पलंगाजवल उभी असताना, “मी तुला माझ्या मुलांसमोर धरतो” असे म्हणून फिर्यादी महिलेचा मिठी मारून विनयभंग केला.त्यावेळी फिर्यादी महिला आरोपीच्या मुलाला म्हणाली कि,तुझ्या बापाला समजावून सांग त्यावेळी गणेश निकम याला राग येऊन त्यानेही अश्लील शेरेबाजी केली आहे.व “आमचे काय वाकडे करायचे ते कर” असे म्हणून शिवीगाळ केली व मी तुला मरे पर्यंत धरल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी गु.र.नं.१/२०२० भा.द.वि.कलम ४५२,३५४,३४,१०९,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.