कोपरगाव तालुका
अल्पवयीन मुलीचा चुलत भावाकडूनच विनयभंग,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस सुमारे बावीस कि.मी. अंतरावर असलेल्या उक्कडगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच गावातील तिच्याच चुलत भावाने दुपारच्या माध्यमिक शाळेच्या मधल्या सुट्टीत आपल्या भाच्याला सांभाळण्याचा बहाणा करून घरात बोलावून तिचा विनयभंग केला असून तिने आरोपी योगेश दगु बागुल याच्या ताब्यातुन कशीबशी सुटका करून घेतली असून त्या नंतर आपल्या माता-पित्यांना त्या बाबत खबर करून त्यांच्यासह रात्री साडेदहाच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.सलग चार दिवसात या गावात विनयभंगाचा हि दुसरी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अल्पवयीन मुलीस घरात बोलावल्या नंतर आरोपी योगेश बागुल याने तिच्या कडेवरील भाच्याला खाली ठेवण्यास भाग पाडून तेथील पलंगावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र तिने तिच्याकडे असलेल्या टाचणीच्या साहाय्याने त्याच्या ताब्यातून कशीबशी सुटका करून घेतली ती निघून जात असताना,” तू यातील कोणाला काही सांगितले तर मी घरात काहीही करून घेईन” अशी धमकी दिली आहे.या घटनेने हि मुलगी खूपच घाबरली होती.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि.कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ३१ डिसेंबर रोजी एका महिलेचा घरात दूरदर्शन पहात असताना त्याच गावातील पिता-पुत्रांनी वर्षाच्या शेवटच्या रात्री नऊच्या सुमारास विनयभंग केल्याची व त्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याच्या बातम्या प्रसिद्ध होण्याच्या आतच चौथ्या दिवशी सलग हि दुसरी घटना घडली आहे.उक्कडगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सुशीलामाई काळे माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व आपल्या माता-पित्यासोबत व आपला एक भाऊ व तीन बहिणीसोबत हि अल्पवयीन मुलगी रहिवासी आहे. या मुलीची शाळा दुपारच्या दीडच्या सुमारास जेवणासाठी सुटली असता आरोपीने त्याचा लहान भाचा घेण्याच्या बहाण्याने तिला घरात बोलावले तिने येण्यास नकार दिल्यावर तिला धमकावून बोलावून घेतले व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे.दरम्यान या घटनेच्या वेळी तेथे काही मुले खेळत होती त्यांना ह्या आरोपीने हुसकावून दिले होते.घरात बोलावल्या नंतर आरोपी योगेश बागुल याने तिच्या कडेवरील भाच्याला खाली ठेवण्यास भाग पाडून तेथील पलंगावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र तिने तिच्याकडे असलेल्या टाचणीच्या साहाय्याने त्याच्या ताब्यातून कशीबशी सुटका करून घेतली ती निघून जात असताना,” तू यातील कोणाला काही सांगितले तर मी घरात काहीही करून घेईन” अशी धमकी दिली आहे.या घटनेने हि मुलगी खूपच घाबरली होती. तिच्या आवाजाने काही मुले बाहेर जमा होते.तसेच तेवढ्यात वडीलही आले होते.तिने बाहेर येताच तेथे दिसलेल्या आपल्या पित्याकडे धाव घेतली.त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच तिला आपल्या दुचाकी गाडीवर बसवून घेऊन तिच्या आईकडे शेतात नेऊन सोडले. त्यावेळी तिने तिच्याशी झालेला अतिप्रसंग विशद केला असून रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी योगेश बागुल याच्या विरुद्ध गु.र.नं.-३/२०२० भा.द.वि.कलम ३५४,५०६ सह बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.या लागोपाठच्या दोन घटनांनी या गावातील महिला आणि अल्पवयीन मुलींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.