कोपरगाव तालुका
आत्मा मालिकला ‘कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट विद्यालय पुरस्कार’
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलास डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट विद्यालय पुरस्कार’ नुकताच प्राप्त झाला आहे.गुरुकुलाच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम आयोजित केले जातात. सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षेमध्ये वि़द्यालय राज्यामध्ये अव्वल आहे. सन २०१८-१९ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत ८१ विद्यार्थ्यी, एन.एम.एम.एस परीक्षेत १५० विद्यार्थी, एन.टी.एस.परीक्षेत ६३ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले असून नॅशनालिस्ट टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये विजय गोर्डे हा राज्यात प्रथम आलेला आहे. त्याचीच फलश्रृती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी केले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व राष्ट्र उभारणीच्या उद्देशाने राबविण्यात येणा-या नाविन्यपूर्ण, सृजनशील, स्पर्धात्मक उपक्रमातून विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती इ. क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रयन्त करणा-या शाळांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
पुरस्काराबदद्दल आत्मा मालिक ध्यान योग मिशन तथा महाराष्ट्र योग असोसिएशनचे अध्यक्ष परमानंद महाराज, निजानंद महाराज, ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, वसंतराव आव्हाड, प्रकाश जमधडे, प्रकाश गिरमे, माधवराव देशमुख, व्यवस्थापक हिरामण कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.