जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

औद्योगिक वसाहतीतून पन्नास हजारांची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या ईशानेन्स असलेल्या कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीतील राधिका इंडस्ट्रीज या कारखान्यातून अज्ञात इसमाने एक लॅपटॉप व पंचवीस हजारांची रोकड अशी पन्नास हजारांची चोरी केल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या कंपनीचे मालक भास्करराव सखाराम वाके यांनी नोंदवली आहे.

राधिका इंडस्ट्रीज या कंपनीचे कामगार व मालक आपले दैनंदिन काम उरकून गुरुवार दि.२६ डिसेंबर रोजी सायंकाळी आपल्या घरी निघून गेल्यावर रात्रीच्या सुमारास टेहळणीवर असलेल्या अज्ञात चोरट्याने कंपनीत कोणी नाही हि संधी साधत कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून पंचवीस हजारांचा लॅपटॉप व पंचवीस हजार रुपये रोख असा पन्नास हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.कंपनीचे मालक व कामगार सकाळी आपल्या नियमित वेळेत आल्यावर हि गंभीर बाब त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री दारकुंडे हे करीत आहे.दरम्यान या चोरीमुळे कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीत चोरट्यांची भीती पसरली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close