जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शिर्डीत प्रतिकात्मक भिक्षा झोळी कार्यक्रम उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०३ वा श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात आलेला प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रम पार पडला आहे.

आज शिर्डीत जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी मालती यार्लगड्डा आणि संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व त्‍यांचे पती संजय धिवरे सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग,नासिक यांच्‍या हस्‍ते रितीरिवाजाप्रमाणे समाधी मंदिरातील स्‍टेजवर आराधना विधी करण्‍यात आला.

उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर श्री साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती, अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी प्रतिमा,अप्‍पर महसुल विभागीय आयुक्‍त नाशिक तथा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य भानुदास पालवे यांनी वीणा आणि संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी पोथी घेवुन सहभाग नोंदवला. यावेळी मालती यार्लगड्डा,सुनिता पालवे,वैशाली ठाकरे,सरंक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी,मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते.
सकाळी ०६.०० वाजता जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी मालती यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा करण्‍यात आली. सकाळी ०८.३० वाजता संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व त्‍यांचे पती संजय धिवरे सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग नासिक यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्‍यात आला. सकाळी ०९.०० वाजता जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती, अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात काढण्‍यात आलेल्‍या प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.या भिक्षा झोळी कार्यक्रमात अप्‍पर महसुल विभागीय आयुक्‍त, नाशिक तथा संस्‍थान तदर्थ समिती सदस्‍य भानुदास पालवे,उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग संजय धिवरे व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे आदी सहभागी झाले होते.
तर यावेळी मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदे,सरंक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी,मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते.भिक्षा झोळीकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून दान भिक्षा स्विकारण्‍याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४, पिंपळवाडी रोड गेट नंबर ०२, चावडी समोर, नाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. सकाळी १०.०० वाजता मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचा कीर्तन कार्यक्रम झाला.
सकाळी १०.३० वाजता जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी मालती यार्लगड्डा आणि संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व त्‍यांचे पती संजय धिवरे सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग,नासिक यांच्‍या हस्‍ते रितीरिवाजाप्रमाणे समाधी मंदिरातील स्‍टेजवर आराधना विधी करण्‍यात आला. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन करण्‍यात आले. सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती झाली. तर रात्रौ १०.३० वाजता शेजारती झाली.
यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने कोईमतुर येथील दानशूर साईभक्त श्री.नागाराज यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व शिर्डी येथील सुनिल बाराहाते, साईसमर्थ डेकोरेटर्स यांनी देणगीस्‍वरुपात मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तसेच रतलाम येथील साईभक्‍त अनिल सिसोदिया, श्री साई सेवा समिती ट्रस्‍ट यांनी मंदिर परिसरात ठिक-ठिकाणी आकर्षक रांगोळी काढल्‍या.
उत्‍सवाच्‍या तृतिय दिवशी शनिवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ०५.०५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपूजा होईल. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती होऊन रात्रौ १०.३० वाजता शेजारती होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close