कोपरगाव तालुका
तीव्र इच्छाशक्ती माणसाला जगण्याची प्रेरणा देते’-प्राचार्य सोळुंके
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अनेक महात्म्यांनी अहोरात्र श्रम करून आपली प्रतिभा विकासित केली असून त्यांच्या जीवन प्रवासातूनच नवीन पिढीचे व्यक्तिमत्त्व विकसित होते,तोंडाचा कँन्सर सारख्या असाध्य रोगाशी निकराची झुंज देणारा आधुनिक शक्तिशाली पुरुष म्हणून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची इच्छ्शक्ती अदभूत असल्याने इच्छ्शक्तीच माणसाला जगण्याची प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन उच्च माध्यमिक विद्यालय,करमाडचे प्राचार्य प्रदीप सोळुंके यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
सदर प्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये अॅड्. भगिरथ शिंदे,यांनी सांगितले की रयतला व रयतच्या विद्यार्थ्यांना जग जिंकण्याचा आशावाद शरद पवार यांनीं दिला.त्यांची कार्यपद्धती तरुणांना लाजवेल अशीच आहे म्हणून त्यांच्या व्यक्तित्व कृतीतून आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड्. भगिरथ शिंदे हे होते.
त्या वेळी पुढे बोलताना म्हणाले कि, पवार यांनी पाच पाच किलोमीटर पायी प्रवास करून शिक्षण प्रेमाचे जतन केले,मानसं जोडली,वेळेचा सदुपयोग व योग्य नियोजन करून जगापुढे आपला आदर्श प्रस्थपित केला म्हणून ते सर्वांचे अनुकरणीय,आदर्शवत झाले असल्याचे भावोद्गार प्रकट केले.
सदर प्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये अॅड्. भगिरथ शिंदे,यांनी सांगितले की रयतला व रयतच्या विद्यार्थ्यांना जग जिंकण्याचा आशावाद शरद पवार यांनीं दिला.त्यांची कार्यपद्धती तरुणांना लाजवेल अशीच आहे म्हणून त्यांच्या व्यक्तित्व कृतीतून आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.प्राचार्य डॉ.शंकर थोपटे यांनी केले. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला. या कार्यक्रमात महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संदीप वर्पे,सुनिल गंगुले, प्रदीप सोळुंके यांचा परिवार,उपप्राचार्य प्रा.रमेश झरेकर,डॉ.रामदास पवार,डॉ.विजय निकम,प्रा.दिलीप सोनवणे,अधीक्षक वसंत पवार ,सर्व प्राध्यापक,शिक्षक-शिक्षेकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती छाया शिंदे,प्रा.चित्रा करडे, प्रा.प्रकाश सावंत यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.माधव यशवंत यांनी मानले.