कोपरगाव तालुका
महिलांना स्वतःचे संरक्षण करता आलं पाहिजे -पुष्पाताई काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशात व राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहे. अशा घटना नित्याच्याच झाल्या असून पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. जर मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार करून त्यांची मानसिकता बदलली असती तर कदाचित आजची दुर्दैवी वेळ आली नसती असे प्रतिपादन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो हा सिद्धांत सुशीलामाई काळे यांनी कर्मवीर शंकरावजी काळे यांना भक्कम साथ देवून सिद्ध केला आहे. सौ. सुशीलामाई काळे यांच्यामुळेच कर्मवीर शंकरराव काळे यांनी शिक्षण, सहकार, सामाजिक आदी क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांनी निरंतर वाचन करावे. आपली ज्ञानलालसा भागवायची असेल तर वाचन केलच पाहिजे वाचनामुळे विचाराला व्यापकता येते वाचनाच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडू नये यासाठी ग्रंथालयात जाऊन विविध ग्रथांचे वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी-पद्मकांत कुदळे
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील रयत संकुलाच्या राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथे सालाबादप्रमाणे या वर्षी स्व.सुशीलामाई काळे यांच्या १९ व्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या मार्गदर्शन करत होत्या.
या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, संभाजी काळे, कचरू कोळपे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, रामनाथ काळे, बाळासाहेब ढोमसे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य सुखदेव काळे, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, आदी मान्यवरांसह पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि,अशा घटना सांगून कधीच सांगून घडत नसतात. त्यामुळे आपल्यावर ओढवलेल्या संकटात आपल्याला मदत करण्यासाठी कोणी येईल याची वाट पाहण्यापेक्षा मुलींनी हिम्मत करून स्वतःच संरक्षण स्वतःलाच करता आलं पाहिजे.आपल्या देशामध्ये जी एकत्र कुटुंब पद्धती आहे ती अतिशय चांगली आहे.घरातील वडीलधारी माणस हि घराचा आंधार असतात. आजकालच्या मुलींना लग्न झाल्यांनतर मला घरामध्ये सासू नको, सासरा नको अशा मागण्या चुकीच्या असून त्यामुळे घरातील लहान मुले आजी-आजोबाच्या प्रेमाला मुकतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात आजी-आजोबा असणे अत्यंत आवश्यक असून आजी-आजोबा हे जिवंत कुलूप असल्याचे सांगितले. प्रत्येक स्पर्धा लढण्याची जिद्द शिकवत असते त्यामुळे आयुष्यातील कोणत्याही स्पर्धेत सहभागी होतांना या स्पर्धेकडे बक्षीस म्हणून पाहू नका. स्पर्धेत जरी बक्षीस जिंकता आले नाही तरी चालेल मात्र श्रोत्यांची मने नक्की जिंका असा सल्ला त्यांनी स्पर्धकांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या प्राचार्या छाया काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती रोहिणी म्हस्के व गणेश देशमुख यांनी केले तर आभार स्पर्धेचे सचिव रमेश मोरे यांनी मानले.