जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात वेगवेगळ्या तीन अपघातात दोन ठार

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात आज मध्यरात्रीच्या दीड वाजण्याच्या सुमारास होंडा शाईन (क्रं. एम.एच.१७ ए. क्यु.७८१०)या दुचाकीस मागील बाजूने एका कंटेनरने (क्रं. सी.जी.०७ एन.ए.८५२७) जोराची धडक दिल्याने त्यात कु.किरण संतोष गडाख हि तरुणी जागीच ठार झाली असून विकास नवनाथ निरगूडे हे गंभीररीत्या जखमी झाले आहे.तर दुसऱ्या चांदेकसारे येथे आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दुसरी दुर्घटना घडली असून त्यात एक इसम ठार झाला आहे.मात्र त्यातील मयताचे नाव उशिरा पर्यंत निष्पन्न झालेले नाही.तर तिसरी घटना हि नगर-मनमाड रस्त्यावर येसगाव पाटाजवळ रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली असून त्यात उभ्या असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला (क्रं. एम.एच.२० बी.एल.३४६५) मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने (क्रं. एम.एच.४३ वाय.२९४१) जोराची धडक दिली आहे मात्र त्यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र बसचे मोठे नुकसान झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यात देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत नाशिक जिल्हा हद्दीजवळ गोदावरी उजव्या कालव्याजवळ पाथरे ता.सिन्नर जिल्हा नाशिक येथील इसम विकास निरगुडे हे रात्री उशिरा आपल्या घराकडे जात असताना सिन्नर कडून शिर्डीच्या दिशेने वरील क्रमांकाचा कंटेनर जा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जात असताना त्याने पुढे चालू असलेल्या होंडा शाईन या दुचाकीस जोराची धडक दिली त्यात वरील तरुणी जागीच ठार झाली आहे.तर विकास निरगुडे हे गंभीर जखमी झाले आहे.वरील दोन्ही घटनेची कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.तर कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा असिडचा टँकरने (क्रं.एम.एच.४६ एफ.४८३७) एका दुचाकीस्वारास जोराची धडक दिली असून या अपघातात तो जागेवरच ठार झाल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.मात्र मयताचे नाव मात्र समजू शकले नाही अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.घट्नास्थळावरील स्फोटक रसायन असलेला टँकर दक्षता म्हणून पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवला आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close