जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी मदत करु – आ.आशुतोष काळे यांचे आश्वासन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील जनतेने मला सेवा करण्याची संधी देऊन जो विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठरवून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कायम कटिबद्ध राहू. शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी मदत करू असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात एका कार्यक्रमात बोलताना नुकतेच केले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या माधवराव आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मल्टीस्किल वर्कशॉप व भारतरत्न जे.आर.डी. टाटा ऑटोमोबाईल्स वर्क शॉपचे उदघाटन आ.काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, कैलास ठोळे, विनायकराव गायकवाड, छोटुभाई जोबनपुत्रा, बाळासाहेब पांढरे, सादिक शेख, सुशील पठारे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, अजीज शेख, हिरामण गंगूले, राजेंद्र वाकचौरे, दिनार कुदळे, संतोष डागा, संदीप कपिले, विजय चवंडके, दिनेश संत, दिनकर खरे, दिनेश पवार, राजेंद्र आभाळे, प्रशांत वाबळे, गौतम खंडिझोड, प्रताप गोसावी, मुन्ना पठाण, राहुल शिंदे, संजय कांबळे विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून ज्ञान आत्मसात करावे. शिक्षण हि काळाची गरज असून आपले ज्ञान कधीही वाया जाणार नाही याची खात्री बाळगावी असा बहुमोल उपदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close