जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोकामठाण हद्दीत एकाचा संशयास्पद मृत्यू,कोपरगाव पोलीस ठाण्यात नोंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेऊर कोकमठाण ग्रामपंचायतीच्या शिवारात काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका पंचावन्न वर्षीय वय असलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.हि आत्महत्या कि खून या बाबत या परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झालीय असून विविध तर्कवितर्क लढवले जात आहे.

सदरचे सविस्तर वृत असे कि, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण तीनचारी जवळ असलेल्या श्री कृष्ण मंदिराच्या पूर्वेस नगर-मनमाड रस्त्याच्या बाजूला एका झुडुपात एका अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास काही ग्रामस्थांनी सांगीतली असता कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी तातडीने आपल्या पथकासमवेत धाव घेतली.त्यावेळी त्यांना त्या ठिकणी एक गर्द निळ्या रंगाची विजार व त्यावर राखाडी रंगाचा सदरा घातलेला व पायात चप्पल असलेला ,व दाढी पांढरी-काळी असलेला इसम आढळून आला आहे.त्याच्या उजवा हात रक्ताने माखलेला असून जवळच एक आय.बी.कंपनीची दारूची बाटली,एक पाण्याची बाटली,व हिरव्या रंगाची मूठ असलेले कटर घटनास्थळी आढळेले आहे.दरम्यान हि घटना आत्महत्या कि खून या बाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे यांच्या म्हणण्यानुसार हा इसम काल सकाळी साडे नऊच्या सुमारास या ठिकाणी बसलेला काही नागरिकांना आढळला होता.जवळच एक (एम.एच.२०) अशा क्रमांकाची दुचाकी उभी होती.मात्र आता ती जवळ दिसत असल्याने तर्क-कुतर्कांना उधाण आले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद आपल्या दप्तरी केली आहे,पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close