जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातून दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील गांधीनगर या उपनगरातील झेंडे गल्लीतील रहिवाशी गणेश रामचंद्र अनर्थे (वय-२६) यांच्या घरासमोर त्यांच्या मित्राची साधारण पंचवीस हजार रुपये किमतीची उभी करून ठेवलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस हि दुचाकी (एम.एच.१७ बी.ए.४६५२) साडे अकराच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चालू करून घेऊन निघून गेल्याची फिर्याद त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, आपण गांधीनगर येथे आपल्या कुटुंब कबिल्यासह राहतो.आपण खाजगी नोकरी करत असून रात्रीच्या सुमारास घरी आलो असता घराच्या समोरच आपण आपला मित्र समीर सिकंदर शेख यांचे कडून तात्पुरत्या कामासाठी आणलेली वरील क्रमांकाची दुचाकी उभी करून ठेवली होती. रात्री साडे अकराच्या सुमारास आपल्याला गाडीचा आवाज आला असता आपण घराचे दार उघडून बाहेर आलो असता आपल्या घरासमोर उभी करून ठेवलेली मित्राची दुचाकी लंपास झालेली आढळली.त्या नंतर आपण आपल्या मित्रास बरोबर घेऊन शहरात गाडीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.त्यामुळे आपण या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी गु.र.नं.४१०/२०१९ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close