जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात सोनाराची २.५८ लाखांची लूट,गुन्हा दाखल,आरोपी फरार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत आपला सोनारकीचा व्यवसाय करणारे मात्र कोपरगाव येथे काले मळा येथील रहिवाशी सोनार महेंद्र मूरलीधर कुलकर्णी यांची काल सायंकाळच्या सुमारास डाऊच खुर्द शिवारात कोपरगावकडे आपल्या दुचाकीवरून घराकडे येत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी कोयता,तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम व आठ तोळे सोने असा दोन लाख ५८ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सुवर्णकार हे आपले दुकान आटोपून रोजच्या वेळी परत घराकडे निघाले असतांना डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर “हॉटेल माईल स्टोन”या ठिकाणी आले असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या एका दुचाकीवर असलेल्या तिघा चोरट्यांनी मागच्या बाजूने येऊन त्यांना ती आडवी घालून त्यांची दुचाकी थांबविण्यास भाग पाडले.व त्यांना तलवारीचा धाक दाखवून खाली पाडून,लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळचे बॅगेतील अठरा हजार रुपये रोख त्यात पाचशे,दोनशे.शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.या खेरीज त्यांच्या जवळचे आठ तोळे सोने घेऊन पोबारा केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त सारे कि,महेंद्र कुलकर्णी हे मूळचे कोपरगाव येथील काले मळा येथील रहिवाशी असून त्यांनी अत्यंत कष्टाने आपला व्यवसाय कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत सुरु केला होता.या व्यवसायासाठी ते रोज कोपरगाव ते जवळके असा अठरा कि.मी.चा प्रवास आपल्या होंडा पॅशन प्रो या गाडीवरून करत असतात.त्यांचा हा व्यवसाय आज भरभराटीस आलेला असताना गेली पंधरा वर्षांपासून ते तो निर्वेधपणे करत आहे.मात्र काल ते आपले दुकान आटोपून रोजच्या वेळी परत घराकडे निघाले असतांना डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर “हॉटेल माईल स्टोन”या ठिकाणी आले असताना त्यांच्या पाळतीवर असलेल्या एका दुचाकीवर असलेल्या तिघा चोरट्यांनी मागच्या बाजूने येऊन त्यांना ती आडवी घालून त्यांची दुचाकी थांबविण्यास भाग पाडले.व त्यांना तलवारीचा धाक दाखवून खाली पाडून,लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळचे बॅगेतील अठरा हजार रुपये रोख त्यात पाचशे,दोनशे.शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.या खेरीज त्यांच्या जवळचे आठ तोळे सोने असा २ लाख ५८ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.त्यामुळे ते अत्यंत घाबरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आले व त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.नं.४०९/२०१९ भा.द.वि.कलम ३९४,३४१ व भा.ह.का.कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप बोरसे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close