जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत,सापळा लावण्याची ग्रामस्थांची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वडगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी राधाकिसन दगुजी बारगळ यांच्या वस्तीवर जाऊन तेथील शेळी फस्त करून नजीकचे शेतकरी दत्तू कांगणे यांच्या वस्ती जवळून जाऊन दोन बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून या बिबट्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी तेथील सरपंच,उपसरपंच,शेतकरी आदींनी केली आहे.

वडगाव ग्रामपंचायत हद्दीत नुकतेच दोन बिबटे आढळले आहे.ती बहुधा नर-मादीची जोडी असावी असा संशय अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.त्यातील एका बिबट्याने नुकताच राधाकिसन दगुजी बारगळ यांचे शेतातील वस्तीवर जाऊन तेथे बांधून ठेवलेली शेळी फस्त केली आहे.या शिवाय त्याने दत्तू कांगणे यांचेही शेतात जाऊन तेथील हाकहवाला घेऊन पुढे रवाना झाला आहे.

वर्तमानात रब्बी पिकांचा पाणी देण्याचा हंगाम उत्साहात सुरु असून कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.मात्र दिवस महावितरण कंपनीची वीज मात्र दिवसा गायब असल्याने शेतकऱ्यांना जोखीम पत्करून आपल्या रब्बी पिकांना पाणी दयावे लागत आहे.अशातच बिबट्यांनीं कोपरगाव तालुक्यात आपली दहशत निर्माण केली आहे.तालुक्याचा पश्चिम भाग त्याला अपवाद नाही.

वडगाव ग्रामपंचायत हद्दीत नुकतेच दोन बिबटे आढळले आहे.ती बहुधा नर-मादीची जोडी असावी असा संशय अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.त्यातील एका बिबट्याने नुकताच राधाकिसन दगुजी बारगळ यांचे शेतातील वस्तीवर जाऊन तेथे बांधून ठेवलेली शेळी फस्त केली आहे.या शिवाय त्याने दत्तू कांगणे यांचेही शेतात जाऊन तेथील हाकहवाला घेऊन पुढे रवाना झाला आहे.तेथील शेतकऱ्यांच्या हि बाब लक्षात आल्याने त्यांच्यासह वडगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत कोपरगाव तालुका वन विभागाने सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोपरगाव बाजार समितीचे माजी सभापती गोपीनाथ केदार व वडगाव ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच संदीप सांगळे,उपसरपंच प्रवीण कांगणे आदींनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close