जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पिपल्स बॅक सहकारातील जुनी बँक-कौतुक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव पिपल्स बॅक ही सहकार क्षेत्रातील जुनी बॅक असुन कोपरगांव तालुक्यातीलच नव्हे तर संपुर्ण अहमदनगर जिल्हयातील नावारुपास आलेली बॅक आहे असे प्रतिपादन आ.सुधीर तांबे यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी आज कोपरगाव येथील सहकारात अग्रणी असलेल्या कोपरगाव पीपल्स बॅकेस सदिच्छा भेट दिली व नूतन अध्यक्ष सत्येन मुंदडा यांचा सत्कार केला त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी संगमनेर येथील संग्राम पतसंस्थेचे अध्यक्ष राणिप्रसाद मुंदडा,माधवराव देशमुख,जिल्हा काॅग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे, बॅकेचे उपाध्यक्ष प्रतिभा शिलेदार,संचालक डाॅ.विजय कोठारी,सुनिल कंगले,धरमचंद बागरेचा,कल्पेश शहा,माजी अध्यक्ष अतुल काले,सुनिल बंब,हेमंत बोरावके,वसंतराव आव्हाड,रविंद्र ठोळे,यशवंत आबनावे,सहाय्यक व्यवस्थापक जितेंद्र छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या वेळी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी बॅकेचे कार्यपध्दतीची माहिती घेतली तसेच अध्यक्ष सत्येन मुंदडा हे लायन्स क्लबचे माजी जिल्हाध्यक्ष व कोपरगांव न.पा. सदस्य असुन त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे त्याचा निश्चीतच फायदा बॅकेचे प्रगतीसाठी होणार असुन त्यांना सदिच्छा व्यक्त केल्या. सदर भेटीवेळी बॅकेचे माजी अध्यक्ष व विदयमान संचालक कैलासचंद ठोळे यांनी प्रास्तावीक करताना,”सध्या सहकारी बॅकांबाबत रिझव्र्ह बॅकेचे असलेला दृष्टीकोन,नविन होत असलेले घटनाबदल व बाजारातील असलेले मंदीचे वातावरण याबाबत चर्चा केली. त्यावेळी उपस्थितांचे बॅकेचे नूतन अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी सदर भेटीबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close