कोपरगाव तालुका
कोपरगावात..ती संरक्षक भिंत पाडून हागणदारी सुरु,नागरिकांत संताप
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषद नागरी स्वच्छता अभियान प्रयत्नपूर्वक राबवत असताना जिल्हा परिषदेच्या संवर्धन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या जागेत नुकतेच जिल्हा नियोजन विभागाने सुमारे ५५ लाख रुपयांचा खर्च करून उभारलेल्या संरक्षक भिंतीचे काम नूतेच पूर्णत्वास आले असताना सदर भिंत फोडून त्यात काही नागरिकांनी उघडी हागणदारी सुरु केल्याचे धक्कादायक चित्र वर्तमानात दिसून येत असून याबाबत सर्वांनीच हाताची घडी अन तोंडावर बोट ठेवल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे.
आ.काळे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यास सुरक्षा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नपूर्वक ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.व हे काम त्यांनी अग्रक्रमाने पूर्ण करीत आणले आहे.मात्र हे काम पूर्ण झाले असताना या संरक्षक भिंतीला पश्चिम बाजूने येवला रोडला लागून देवी मंदिराच्या नजीक काही नागरिकांनी रस्त्याच्या अग्रभागात एक हिरव्या रंगाचे कापड लावून मागील बाजूस या भिंतीला खिंडार पाडून त्या ठिकाणी उघडी हागणदारी सुरु केली आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या करिता या शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील सर्व नागरीकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देवून हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली त्यानुसार हे अभियान २ ऑक्टोंबर २०१४ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे ०२ ऑक्टोंबर २०१९ पर्यंत संपूर्ण देशात राबविण्यात आले आहे.व अजूनही पुढेही तसेच सुरु आहे.हि गौरवास्पद बाब आहे.यात कोपरगाव नगरपरिषदेने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या पश्चिम भागात सतरावे स्थान प्रयत्नपूर्वक मिळवले असताना त्याला छेद देण्याचे काम सध्या सुरु आहे.कोपरगावचे माजी आ.अशोक काळे यांनी पशुसंवर्धन विभागाला जुनी जीर्ण इमारत निकामी झाल्याने त्यासाठी नूतन इमारत पूर्ण करण्यासाठी आपल्या दहा वर्षाच्या काळात निधी आणून हि इमारत पूर्ण केली होती.मात्र सन-२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने या पशुसंवर्धन विभागाच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याचे तसेच राहून गेले होते.त्या कामाला व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत आदी सार्वजनिक कामाला पिंडाला जसा कावळा शिवत नाही तसे भाजपच्या राजवटीत या कामाला कावळा शिवला नव्हता.कोपरगाव तालुक्यातील राजकीय विचारधारा किती खालावली आहे याचे हे उत्तम उदाहरण बनले होते.मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे हे आमदार म्हणून निवडून आले आणि या प्रलंबित कामाचे भाग्य फळाला आले आहे.कोपरगावचे नव्या दमाचे आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा नियोजन विभागाकडून पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्याच्या परिसरात असलेली हागणदारी बंद करण्यासाठी व या दवाखान्यासाठी सुरक्षा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नपूर्वक ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.व हे काम त्यांनी अग्रक्रमाने पूर्ण करीत आणले आहे.मात्र हे काम पूर्ण झाले असताना या संरक्षक भिंतीला पश्चिम बाजूने येवला रोडला लागून देवी मंदिराच्या नजीक काही नागरिकांनी रस्त्याच्या अग्रभागात एक हिरव्या रंगाचे कापड लावून मागील बाजूस या भिंतीला खिंडार पाडून त्या ठिकाणाहून आत जाण्या-येण्यासाठी जागा केली आहे.व त्या जागेचा वापर ते थेट आपल्या उघड्या हागणदारीसाठी करत असून याकडे ना नगरपरिषेचे लक्ष आहे.ना पशुसंवर्धन विभागाचे,ना या भिंतीचे काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यामुळे एकीकडे नगरपरिषद नागरी स्वच्छता अभियानाचा ढोल-डंका पिटत असताना दुसरीकडे या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यापाठीमागे हि हागणदारी ऐन बहरात आली आहे.आगामी काळात नगरपरिषदेस भेट देण्यासाठी नागरी स्वच्छता विभागाचे पथक येणार असून त्याच्या आत तरी याकडे वरील स्थानिक स्वराज्य संस्था लक्ष देणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.या बेशिस्त नागरिकांवर नगरपरिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग,पशु संवर्धन विभाग काय कारवाई करणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.