जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेचा विनयभंग,आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेली महिलेशी ओळख करून वारंवार भ्रमणध्वनीवर फोन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्या प्रकरणी सदर महिलेने राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील आरोपी शेख दस्तगिर ईसाक याचे विरुद्ध गुन्हा दाखल केल्या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव,राहाता तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

आरोपीची व आपली साधारण दिड वर्षा पूर्वी आरोपीशी ओळख झाली होती.त्याचा गैरफायदा घेत आरोपीने आपल्याला वारंवार मोबाईलवरून फोन करून,”तू,मला फार आवडते” असे म्हणून सदर फिर्यादी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन तिला व तिच्या पतीला वाईट वाईट शिवीगाळ केली आहे.

भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येतो.कलम ३५४ आणि कलम ५०९ स्त्रियांचे विनयभंगापासून संरक्षण करतात.सदर गुन्हा हा नैतिक अधःपतनांशी संबंधीत मानला जातो.सदर कायदा हा स्त्रियांच्या हितासाठी आहे.तसा तो सार्वजनिक जीवनातील नैतिक आणि सभ्य वर्तनाशी संबंधीत आहे.म्हणून हा कायदा व्यक्तीचा व्यक्तिशी झालेल्या वर्तनापुरता मर्यादीत नसून त्याकडे सार्वजनिक ठिकाणी पाळायची सभ्यता आणि नैतिकता याच्याशी संबंधीत व महत्वाचा मानला जातो.या बाबत अलीकडील काळात गुन्हे वाढले असल्याचे दिसून येत आहे.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच घटना नुकतीच उघड झाली आहे.

  याबाबत आपदग्रस्त महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपली साधारण दिड वर्षा पूर्वी आरोपीशी ओळख झाली होती.त्याचा गैरफायदा घेत आरोपीने आपल्याला वारंवार मोबाईलवरून फोन करून,”तू,मला फार आवडते” असे म्हणून सदर फिर्यादी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आहे.व तिचा वांरवार पाठलाग करून तशी मागणी केली आहे.तसेच फिर्यादी व फिर्यादी महिलेच्या पतीच्या भ्रमणध्वनीवर वारंवार फोन करून अश्लील भाषेत संभाषण करून घाण-घाण शिवीगाळ करून बदनामी करण्याची धमकी दिली आहे.दि.१९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता त्या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे.त्यामुळे संतापून सदर महिलेने तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी आरोपी दस्तगिर शेख याचे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्हा दाखल  केला आहे.

   दरम्यान या प्रकरणी फिर्यादी महिलेने आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१३/२०२४ भा.द.वि.कलम ३५४(अ) ३५४(ड)५०४,५०६,५०७  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
  
    दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाटेवाल हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close