जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

….या विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात झाला साजरा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानाजीक कोपरगाव बेट भागात असलेल्या लायन्स क्लब कोपरगाव संचलित मूकबधिर विद्यालयात दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.

१९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘दिव्‍यांग दिन’ म्हणून घोषित झालेला आहे. शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे दिव्‍यांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून या दिवसाची योजना आहे. दिव्‍यांगाचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो. विविध उपक्रमांद्वारे निधी उभारला जावा म्हणून या दिवसाची योजना आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून १९८३ ते १९९२ हे दशक दिव्‍यांगासाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना अपंगाच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास प्रेरित केले होते. दशकाअखेरीस ‘तीन डिसेंबर’ या दिवसाची निवड झाली होती. यानंतर १९९२ मध्ये पहिला ‘दिव्‍यांग दिन’ साजरा करण्‍यात आला.त्या नंतर सातत्याने दरवर्षी या दिनाचे आयोजन केले जाते.कोपरगाव येथील लायन्स मूक बधिर विद्यालयातही अपंगाप्रति सामान्य माणसाच्या संवेदना जागरूक व्हाव्या या साठी या दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रसंगी विद्यालयात विविध प्रकारच्या अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.स्पर्धांचे बक्षिस वितरण कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल ,नगरसेवक विरेन बोरावके,राजेंद्र वाकचौरे,रजनीताई बोरावके,भारतीय जनता पार्टी दिव्यांग कोपरगाव तालुका अध्यक्ष मुकुंद काळे,मुख्याध्यापक श्री कराळे,राजेंद्र तासकर,अक्षय रत्नपारखी, प्रविन भुजाडे, योगेश गंगवाल,आदी कार्यकर्त्यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .सदर प्रसंगी हेलन केलर यांचे प्रतीमा पुजन करुन हार अर्पण करण्यात आला.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close