जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोदावरी दूध संघ गो-पैदास निर्मितीचा उपक्रम वाढवणार-राजेश परजणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

एका गाईच्या गर्भाशयामध्ये दहा ते पंधरा गर्भाची निर्मिती करुन ते दुसऱ्या गाईंमध्ये प्रत्यारोपन करुन अधिकाधीक गाईंची पैदास करण्याचा लक्षवेधी उपक्रम राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व गोदावरी दूध संघाच्या संयुक्त सहकार्याने कार्यक्षेत्रात राबविणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिली आहे.

एखाद्या सुदृढ गाईवर रेतन करुन तिच्या गर्भाशयामध्ये दहा ते पंधरा गर्भाची निर्मिती करता येते. २१ दिवसानंतर ते गर्भ काढून इतर दहा ते बारा गाईंमध्ये एकाचवेळी त्यांचे प्रत्यारोपन केले जाते. साधारणपणे आठ ते नऊ महिन्यांमध्ये वासरे जन्माला येतात. कमी कालावधीमध्ये अधिकाधीक गोपैदास होण्याचे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर असून दुग्ध व्यवसाय वाढीतून दूध उत्पादकांना चांगला आर्थिक लाभ यातून होऊ शकतो.

सदर प्रसंगी संघाचे संचालक राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष संजय खांडेकर, संचालक उत्तमराव माने, विवेक परजणे, कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे आदींसह राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे प्रकल्प समन्वयक डॉ. चंद्रकांत धंदर, बायफ संस्थेचे डॉ. शेख, विभागीय अधिकारी डॉ. ळासाहेब जिगळेकर, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी गर्भ प्रत्यारोपणाविषयी माहिती देताना डॉ. एस. पी. सिंग यांनी सांगितले की, एखाद्या सुदृढ गाईवर रेतन करुन तिच्या गर्भाशयामध्ये दहा ते पंधरा गर्भाची निर्मिती करता येते. २१ दिवसानंतर ते गर्भ काढून इतर दहा ते बारा गाईंमध्ये एकाचवेळी त्यांचे प्रत्यारोपन केले जाते. साधारणपणे आठ ते नऊ महिन्यांमध्ये वासरे जन्माला येतात. कमी कालावधीमध्ये अधिकाधीक गोपैदास होण्याचे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर असून दुग्ध व्यवसाय वाढीतून दूध उत्पादकांना चांगला आर्थिक लाभ यातून होऊ शकतो. हे तंत्रज्ञान गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात राबविण्यासंदर्भात आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत विचार विनीमय करण्यासाठी लवकरच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे संबंधित तंत्रज्ञ आणि संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांची बैठक आयोजित करुन निर्णय घेतला जाईल अशी माहिती अध्यक्ष राजेश परजणे यांनी शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close