कोपरगाव तालुका
प्रेरणा फाउंडेशन प्रेणीत जेष्ठ नागरिक संघटना स्थापन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहरात प्रेरणा फाउंडेशन च्या वतीने प्रेरणा फाउंडेशन प्रेणीत जेष्ठ नागरिक संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रेरणा फाउंडेशन चे अध्यक्ष अॅड.मनोज बाळासाहेब कडू यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.
या वेळी प्रेरणा फाउंडेशन प्रणीत जेष्ठ नागरिक संघटनेची कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली आहे.यात अध्यक्ष म्हणून अरविंद ससाणे,उपाध्यक्ष म्हणून सुवालाल भंडारी,सचिव म्हणून छबुराव नजन,खजिंदार म्हणून मोहनलाल तिवारी,यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवडी प्रसंगी सर्वानुमते सर्व संमतीने भविष्यकाळात संघटनेच्या वतीने वृक्षारोपण,शालेय स्पर्धा, आरोग्य शिबिरे, जेष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासंबंधी सामाजिक पुढाकार घेऊन काम करण्याचे धोरण ठरवण्यात आले.
याप्रसंगी अॅड.मनोज बाळासाहेब कडू,अरविंद ससाणे,अशोक कोठारी,विजय बंब,सुवलाल भंडारी,प्रेमराजभंडारी,शरद घाटे,छबुराव नजन,बबनराव वाघ,विकास कुलकर्णी,मोहनलाल तिवारी,सुधाकर मोरे,लक्ष्मण कुरलेकर,सीताराम डांगे,नंदकुमार मेहेर,संभाजी नाईक सर,चिने सर,श्रीकांत जोशी,मुस्तफा शेख, सदर कार्यक्रम प्रसंगी हे सर्व उपस्थित होते.