कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील विकासकामांना वेग आल्याचा दावा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांना मागील दोन वर्षापासून तालुक्याच्या विकासासाठी मिळत असलेल्या मोठ्या निधीतून विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नसल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी मढी येथील एका कार्यक्रमात केले.
“कोपरगाव तालुक्यातील जनतेने साडेचार वर्षापूर्वी मोठ्या विश्वासाने दिलेल्या जबाबदारीतून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळाली त्या विकासाच्या बळावर सुज्ञ मतदारांनी आपल्याला विधानसभेत निवडून दिले.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात रस्ते,वीज आणि पाणी आदि समस्या सुटण्यास मदत झाली आहे”-आशुतोष काळे,आमदार कोपरगाव विधानसभा मतदार संघ.
कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील ग्रा.मा. १०४ सा. क्र. ०.६०० येथे सी.डी. वर्क करणे व मढी खुर्द ते पाथरे जिल्हा हद्द रस्ता खडीकरण करणे कामाचे व मढी बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील सी.डी. वर्क करणे व मढी बु. ते कोळगाव रस्ता खडीकरण करणे कामाचे भूमिपूजन तसेच आ. काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून रामा ३० ते सचिन खर्डे घर रस्ता खडीकरण कामाचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम,संचालक सुनील शिंदे,आनंदराव चव्हाण,संभाजी काळे,माहेगाव देशमुख सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र काळे,सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे,भास्करराव काळे,मच्छिंद्र जाधव, प्रकाश काळे,रोहिदास होन,राहुल रोहमारे,देवेन रोहमारे,नंदकिशोर औताडे,राजेंद्र औताडे, देर्डेचे सरपंच योगिराज देशमुख,मढी बु.चे सरपंच प्रवीण निंबाळकर,उपसरपंच रेखा गवळी, मढी खु.चे सरपंच सुनील भागवत,नरहरी रोहमारे,श्रीधर आभाळे,सोपानराव गवळी,भाऊसाहेब कुऱ्हाडे,उत्तमराव कुऱ्हाडे,बिपीन गवळी,अशोक गवळी,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,उपअभियंता उत्तमराव पवार,शाखा अभियंता दिघे,ग्रामविकासअधिकारी अशोक नेवगे,श्रीमती नजनसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, “ग्रामीण भागातील जनतेने साडेचार वर्षापूर्वी मोठ्या विश्वासाने दिलेल्या जबाबदारीतून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळाली त्या विकासाच्या बळावर सुज्ञ मतदारांनी मला विधानसभेत निवडून दिले. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात रस्ते,वीज आणि पाणी आदि समस्या सुटण्यास मदत झाली आहे. विद्यमान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्वच सदस्यांनी काम करून विकासाचे मोठे उभे केले आहे. व मागील दोन वर्षापासून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी मिळत असलेल्या मोठ्या निधीतून विकासाचा वेग अजूनच वाढलेला आहे.यापुढेही विकासाची हि गती थांबणार नाही अशी ग्वाही दिली.मतदार संघाच्या विकासाच्या विविध समस्या आहेत.या समस्या बहुतांशी प्रमाणात सोडविण्यात यश मिळाले असून यापुढील काळातही सर्व समस्यांचा निपटारा करून तालुक्याच्या विकासाचा रथ प्रगतीपथावर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.