जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरासाठी पुन्हा पाच कोटी रुपये !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा ५ कोटी निधी मंजूर केला असून आजपर्यंत कोपरगाव शहरासाठी दीडच वर्षात प्रतिकूल परिस्थितीत १२ कोटी रुपये निधी महाविकास आघाडी सरकारकडून मिळविला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेल्या विविध विकास कामांना निधी मिळविण्यासाठी नगरविकास खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येवून सदर प्रस्तावाला नगरविकास खात्याने मंजुरी देवून शहरातील अतिशय महत्वाच्या विकासकामांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत पुन्हा एकदा ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.त्यामुळे बहुतांशी विकासकामे मार्गी लागणार आहे”-आ.आशुतोष काळे.

कोपरगाव शहरांतील रस्त्यांची गत पाच वर्षात वाट लागली होती.त्यामुळे शहराची नाचक्की होत होती.कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे शहरवासियांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून शहरातील मुख्य रस्ते तसेच विविध विकास कामांना निधी मिळावा याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्याची दखल घेत नगरविकास मंत्रालयाने यापूर्वीच कोपरगाव शहराच्या विकासकामांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत तब्बल ५ कोटी रुपये निधी देवून यामध्ये धारणगाव रोड विकसित करणे २ कोटी, प्रशासकीय इमारती समोरील बगीचा सुधारणा करणे १ कोटी, प्रशासकीय इमारत कंपाऊंड करणे ५० लक्ष, कोपरगाव शहरातील (बाजारतळ) स्मशानभूमी विकसित करणे १ कोटी,कोपरगाव शहरातील (मोहनीराजनगर) स्मशानभूमी विकसित करणे ५० लक्ष असा एकूण ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या इमारतीसाठी देखील दोन कोटी रुपये दिले असून पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तब्बल पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.या निधीतून कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,शाळा दुरुस्ती,सभामंडप बांधणे,सिडी वर्क,कब्रस्थान,स्मशान भूमीच्या विकास करून सोयी-सुविधा निर्माण करणे, सुशोभीकरन करणे आदी विकास कामांचा समावेश आहे.

कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेल्या विविध विकास कामांना निधी मिळविण्यासाठी नगरविकास खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येवून सदर प्रस्तावाला नगरविकास खात्याने मंजुरी देवून शहरातील अतिशय महत्वाच्या विकासकामांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत पुन्हा एकदा ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.त्यामुळे बहुतांशी विकासकामे मार्गी लागणार आहेत.यापुढे देखील कोपरगाव शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी माझा पाठपुरावा अविरतपणे सुरूच राहणार असल्याचे आ.काळे यांनी सांगितले असून कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजीत पवार,नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे,नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close