कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात डेंग्यूचा बळी, प्रशासनाला खबरच नाही !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील विवाहिता संगीता गोरक्षनाथ वाकचौरे (वय-40) या महिलेचा डेंग्यूने बळी घेतला असल्याची धक्कादायक माहिती आली असून कोपरगाव शहर व तालुक्यात जवळपास पन्नासहून अधिक डेंग्यूचे रुग्ण असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांना या बाबत खबरच नसल्याचे उघड झाले आहे.
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
सध्या परतीच्या पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे.वातावरणात गारवा व आभाळ अभ्राच्छादित असल्याने सुक्ष्म जिवाणूंची वाढ मोठ्या प्रमाणावर होऊन त्यातून रोगराई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्याला कोपरगाव तालुका व शहरही अपवाद नाही.डेंगू हा आजार इडीस इजिप्ती डासाच्या चावण्यातून होत असून सध्या आजाराने शहरात अनेकांना जगणे नकोसे केले आहे.अनेक आर्थिक दुर्बल घटकांना हा खर्च परवडणारा नसल्याने त्यांना आपल्या जीवाला हकनाक मुकावे लागत आहे.असेच उदाहरण जवळके ग्रामपंचायत हद्दीतील कायम निवासी व सध्या राहाता तालुक्यात सादतपुर येथे राहत असलेल्या गोरक्षनाथ श्रीपाद वाकचौरे या कुटुंबावर आली आहे.त्यांना आधी या आजाराची तपासणी केली असता त्यांनी या संगीत वाकचौरे या महिलेस नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.मात्र त्यांना वाचविण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले नाही.आज दुपारी या महिलेचे निधन झाले आहे.त्यांच्यावर जवळके येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पच्छात एक मुलगा,पती,सासू,सासरे असा परिवार आहे.
लोकसंख्या वाढ आणि शहरीकरण, स्वच्छतेचा अभाव, अकार्यक्षम डास नियंत्रण, आणि डेंग्यूच्या प्रकरणांचे अधिकृत अहवाल आणि वाढता वाढ यामुळे हे वाढीचे कारण आहे. दक्षिणपूर्व आशिया, पॅसिफिक बेट देश आणि मध्य-पूर्व यांच्या माध्यमातून डेंग्यू पसरला आहे. आज, सुमारे ४०% लोक जगाच्या क्षेत्रात राहतात जेथे डेंग्यूचा धोका संभावतो. डेंग्यू हा स्थानिक रोग आहे,
डेंगू तापामुळे पाठीवर अशी पुरळ येते त्याचे छायाचित्र
दरम्यान कोपरगाव तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींना फवारण्या करण्यासाठी औषधे उपलब्ध करून दिली अशी माहिती पंचायत समितीचे जेष्ठ सदस्य अर्जुन काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण सध्या रजेवर असून या बाबत आपल्याला माहिती नाही आपण डॉ.बडदे यांच्याकडून माहिती घेऊन कळवितो असे सांगितले.उशिराने दिलेल्या माहितीत त्यांनी आज अखेर वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन रुग्ण तर पोहेगाव हद्दीत एक रुग्ण असल्याचे सांगून अद्याप पर्यंत जानेवारी पासून ऑक्टोबर अखेर एक रुग्ण दगावल्याची माहिती दिली आहे.व जवळके येथे अंत्यविधी झालेल्या महिलेचा समावेश राहाता तालुक्यात असून त्यांचे कुटुंब गत चार वर्षापासून राहाता तालुक्यात राहत होते असे सांगितले आहे.