जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

खरिपाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून द्या- आ. काळेंची पवारांकडे मागणी

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस पडून शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. झालेल्या नुकसानीचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून पंचनामे सुरु असून पंचनामे करणारे अधिकारी हे फक्त शेतात उभे असलेल्या व शेतात काढणी करून पडलेल्या पिकांचेच पंचनामे करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.याबाबत काढलेल्या पिकांचे पंचनामे होणे आवश्यक असून त्यांना न्याय देणे गरजेचे असल्याने राष्ट्रवादीचे विधानसभेचे नेते अजित पवार यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देणे आवश्यक असल्याची मागणी आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच केली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना पाऊस झाल्यानंतर काही तासांच्या आत कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आलेले आहे तरी पिक विमा धारक शेतकऱ्यांना कागदपत्राच्या जाळ्यात न अडकविता महसूल मंडलामार्फत केलेला पंचनामा ग्राह्य धरून मदत देण्यात यावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळावी. शेतकरी खरीप पिकाच्या उत्पन्नातूनच रब्बी हंगामाचे पिक नियोजन करीत असतो. जर खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या माध्यमातून उत्पन्नाचा हातभार मिळाला नाही तर रब्बी हंगामाचे पिके उभी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

नेते अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात आ.काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की परतीच्या पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या संकटातून उभे राहण्याचे शेतकऱ्यांपुढे आवाहन असून शासनाकडून मदत मिळेल या आशेवर शेतकरी बसलेला आहे. सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, कांदा रोप आदी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाचे निवेदन अहमदनगर जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देवून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. मात्र ढिगारे लावलेल्या पिकांची मळणी वेळेवर न झाल्यामुळे या पिकांना मोड फुटले असून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतांना देखील पिकांचे पंचनामे होत नाही त्यामुळे आपण नुकसान भरपाई पासून वंचित राहणार या भीतीपोटी शेतकरी हवालदिल झाला असल्याचे आ. काळे यांनी म्हटले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना पाऊस झाल्यानंतर काही तासांच्या आत कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आलेले आहे तरी पिक विमा धारक शेतकऱ्यांना कागदपत्राच्या जाळ्यात न अडकविता महसूल मंडलामार्फत केलेला पंचनामा ग्राह्य धरून मदत देण्यात यावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळावी. शेतकरी खरीप पिकाच्या उत्पन्नातूनच रब्बी हंगामाचे पिक नियोजन करीत असतो. जर खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या माध्यमातून उत्पन्नाचा हातभार मिळाला नाही तर रब्बी हंगामाचे पिके उभी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सलग पंधरा दिवस ६५ मिलीमीटर पाऊस पडणे आवश्यक आहे मात्र कोपरगाव विधानसभा मतदारसंघात जरी सलग पंधरा दिवस ६५ मिलीमीटर पाऊस पडला नसला तरीही ओला दुष्काळ सदृष्यच परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून जेणेकरून एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे व्हावे व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरघोस नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close