जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

कोपरगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार !

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे राहाता नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा निर्णय नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी नुकताच दिला आहे.राहाता पालिकेचा अधिभार या आधी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बांगर यांचेकडे देण्यात आला होता त्यात अंशतः बदल करून हा आदेश दिल्याने कोपरगाव पालिकेतील प्रशासनाच्या कारभारावर अतिरिक्त ताण निर्माण होणार आहे.

दरम्यान नुकतीच विधानसभेची निवडणूक संपली असून कोपरगाव नगरपरिषदेत आचारसंहितेमुळे अनेक कामे प्रलंबित आहेत.शहरात डेंगू व तत्सम आजारांनी डोके वर काढले असून आता कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्रकुमार गावित यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री महानुवार यांच्या मार्फत एका हस्तकाकरवी लाच घेतल्या प्रकरणी त्यांची तेथील लोकप्रतिनिधीने तडकाफडकी बदली करून त्यांचा बचाव करण्यात आला होता.या बाबत अद्याप चौकशी सुरु आहे.त्यानंतर सदर पालिकेचा कारभार संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बांगर यांचेकडे देण्यात आला होता मात्र त्यांची कार्यालयात वारंवार अनुपस्थिती असल्याच्या तक्रारी विधानमंडळ सदस्यांनी शासनाकडे वारंवार केल्या होत्या या बाबीची गंभीर दखल नगरविकास विभागाने घेतली होती.व त्याला अनुसरून हा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्रकुमार गावित यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री महानुवार यांच्या मार्फत एका हस्तकाकरवी लाच घेतल्या प्रकरणी त्यांची तेथील लोकप्रतिनिधींनी तडकाफडकी बदली करून त्यांचा बचाव करण्यात आला होता.या बाबत अद्याप चौकशी सुरु आहे.त्यानंतर सदर पालिकेचा कारभार संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बांगर यांचेकडे देण्यात आला होता मात्र त्यांची कार्यालयात वारंवार अनुपस्थिती असल्याच्या तक्रारी विधानमंडळ सदस्यांनी शासनाकडे वारंवार केल्या होत्या.

त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना आता आठवड्यातील दोन दिवस राहाता नगरपरिषदेत प्रशासकीय कामकाजास द्यावे लागणार आहे.व कोपरगाव बरोबरच आता राहाता नगर परिषदेची कामे वेळेवर होतील या साठी दक्ष राहावे लागणार आहे.सदरची कामे निर्धारित कालमर्यादेत करून वर्तमान विकास प्रकल्पांचा निधी अखर्चित राहणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.विकासकामे प्रलंबित राहिल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या बाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यावर पुढील जबाबदारी सोपविण्यात आली आहे.राहाता येथे हजर होऊन त्याचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावयाचा आहे.दरम्यान नुकतीच विधानसभेची निवडणूक संपली असून कोपरगाव नगरपरिषदेत आचारसंहितेमुळे अनेक कामे प्रलंबित आहेत.शहरात डेंगू व तत्सम आजारांनी डोके वर काढले असून आता कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close