कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा शेळीवर हल्ला,शेळी ठार
न्यूजसेवा
कुभांरी( प्रतिनीधी )
कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे २३ जूनच्या राञीच्या सुमारास नामदेव सुकदेव पोकळघट यांचे गट नं १८२ मध्ये शेतात राहत असून राञी दोन वाजेच्या सुमारास त्याच्या वस्तीवर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला या बिबट्याच्या हल्यामध्ये एक शेळी ठार झाली आहे त्यामुळे धारणगाव शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या हल्याची खबर मिळताच कोपरगाव वन विभागाचे वनरक्षक श्री सांगळे आर.एन.वनपाल बी.एस.गाढे तसेच वन परिक्षत्रक अधिकारी कुमारी प्रतिभा सोनवणे यांनी घटना स्थळी भेट देउन वन्य प्राण्याच्या पायांचे ठसे तपासले व वन रक्षक सांगळे आर.एन.यांनी मृत शेळीचा पंचनामा करुन बजारातील किमत सहा हजार सांगुन नामदेव सुकदेव पोकळघट यांना त्याच्या शेळीच्या मोबदला शासनाच्या नियमानुसार देणार आहोत.या घटनेने धारणगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे.