कोपरगाव तालुका
आ.चौधरी यांचा कोपरगाव नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या वतीने निषेध
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दिनांक १४ जून २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार अवैध कामाची पाहणी करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी गेले असताना भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व इतर अधिकारी यांना माजी आ.संतोष चौधरी यांनी अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता.या घटनेचा कोपरगांव नगरपरिषदेमध्ये कार्यरत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अधिकारी संघटनेकडून आज निषेध करण्यात आला आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना या घटनेचा निवेदन देऊन निषेध करण्यात आला.माजी आ.संतोष चौधरी यांना त्वरित अटक करून यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने यांनी निवेदनाद्वारे केली.यावेळी नाशिक विभाग व अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीचे तसेच कोपरगांव नगरपरिषद कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.