कोपरगाव तालुका
भारम भोसलेच्या संघटित टोळी विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई,गुन्ह्यास होणार प्रतिबंध
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारातील संघटित गुन्हेगारीच्या टोळीचा प्रमुख व अट्टल दरोडेखोर चांगदेव भारम भोसले यांच्या विरुद्ध अनेक गुन्ह्यांचे संदर्भ देत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकतेच दाखल झालेले पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दरोडेखोरांना व त्यांच्या सराईत गुन्हेगारीला कायमचा चाप लावण्यासाठी नाशिकच्या पोलीस महानिरीक्षक यांचेकडे प्रस्ताव पाठवून त्यांना संघटिक गुन्हेगारी विरुद्ध प्रतिबंधक कायदा (मोक्का )लागू केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिक येथील फिर्यादी दिनेश दगडू पाटील यांना गवंडी काम करताना आपल्याला खोदकामात सुमारे एक किलो सोने सापडलेले आहे.ते आपण तुम्हाला स्वस्तात देतो असे अमिश दाखवले व त्यांचा विश्वास संपादन केला तो तसा झाला असल्याची खात्री झाल्यावर त्याना सावळगाव शिवारात हे स्वस्तातील सोने घेण्यासाठी बोलावून घेतले व सात जुलैला त्याना आजूबाजूस कोणी नाही याची खातरजमा करून घेतल्यावर त्यांना लाकडी दांडा, कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम दोन सोन्याच्या अंगठ्या , एक मनगटी घड्याळ असा एकूण दहा लाख 74 हजार रुपयांचा डल्ला भरला होता.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, दोन महिन्यांपूर्वी सात जुलै रोजी चांगदेव भोसले व त्याचे बारा साथीदार यांनी एकमेकांचे संपर्कात राहून नाशिक येथील फिर्यादी दिनेश दगडू पाटील यांना गवंडी काम करताना आपल्याला खोदकामात सुमारे एक किलो सोने सापडलेले आहे.ते आपण तुम्हाला स्वस्तात देतो असे अमिश दाखवले व त्यांचा विश्वास संपादन केला तो तसा झाला असल्याची खात्री झाल्यावर त्याना सावळगाव शिवारात हे स्वस्तातील सोने घेण्यासाठी बोलावून घेतले व सात जुलैला त्याना आजूबाजूस कोणी नाही याची खातरजमा करून घेतल्यावर त्यांना लाकडी दांडा, कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम दोन सोन्याच्या अंगठ्या , एक मनगटी घड्याळ असा एकूण दहा लाख 74 हजार रुपयांचा डल्ला भरला होता.या संदर्भात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 11 जुलैला गुन्हा दाखल झालेला आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने त्यावेळी केला होता त्यात चांगदेव भोसले, शिरू बडोद भोसले,भगीरथ बडोद भोसले,तिघे रा.पढेगाव ता .कोपरगाव येथील रहिवाशी असून ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव (वय-24 )रा वडगाव,करण बाळू मोहिते (वय-25 ) रा.धुळगाव ता.येवला नामदेव फुलचंद जाधव रा .वडगाव,भागवत भारम भोसले, दगु बडोद भोसले,दीपक भारम भोसले,भिवसेंन भारम भोसले,पांडुरंग भारम भोसले,विजय चव्हाण सर्व रा,पढेगाव पांडुरंग फुलचंद जाधव रा.वडगाव आदी आरोपी निष्पन्न झाले होते,हे सर्व आरोपी तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकतील अशा गुन्ह्यात सामील झालेले असल्याचे पोलीस निरीक्षक कटके व पोलिसांच्या लक्षात आले.ते निर्ढावलेले, प्रचलित कायद्याला न जुमानणारे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचे सविस्तर दप्तर वर्तमान पोलीस निरीक्षक यांनी बनवले व त्या बाबतचा सविस्तर अहवाल बनवून त्यांच्या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3 (1).(2),3 (4)हे वाढीव कलम लावणे बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांचे कडे व तेथून तो नाशिक पोलीस महानिरीक्षक यांचे कडे पाठविण्यात आला होता.त्यास त्यांनी मंजुरी दिल्याने या दरोडेखोरांच्या मुसक्या कायम आवळण्यासाठी उपयोग होणार आहे.या गुन्हेगारांनी या परिसरात अनेक वर्षांपासून या भागात उपद्रव माजवलेला होता त्यास आता चाप बसण्यास मदत होणार असल्याने कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे आभार मानले आहेत.