खेळजगत
आत्मा मालिकमध्ये राष्ट्रीय खेळाडू घडतील-वैशाली फडतरे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील आत्मा मलिक शैक्षणींक संकुलात असलेल्या सोयी पाहून आपण हरकून गेले असून भविष्यात या संकुलात नक्कीच राष्ट्रीय खेळाडू घडतील असा आशावाद आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू व प्रशिक्षक छत्रपती पुरस्कार प्राप्त वैशाली फडतरे यांनी नुकताच एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.
केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांचे संयुक्त विद्यमाने 9 व्या सीबीएसई क्लस्टर व्हॉलीबॉल स्पर्धेस आत्मा मालिकमध्ये मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आत्मा मालिक माउली यांचे उपस्थितीत व आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू व प्रशिक्षक छत्रपती पुरस्कार प्राप्त वैशाली फडतरे व प्रियंका बोरा यांचे हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या स्पर्धा आत्मा मालिकमध्ये 13 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धा 17 वर्षे व 19 वर्षे वयोगटातील मुले व मुली या गटांमध्ये पार पडणार आहे. राज्यभरातून मुलांचे 32 संघ तर मुलींच्या 20 संघांनी सहभाग नोंदविला आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी प्रशिक्षक, संघव्यवस्थापक पंच असे मिळून 150 पदाधिकारी सहभागी झालेले आहे. स्पर्धा परीक्षक म्हणून अरविंद बुरूडकर हे काम पाहत आहे. स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून सुरेश शिंदे, पंचप्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय पंच आदिनाथ कोल्हे, रमेशबाबु विद्यार्थी हे काम पाहत आहेत. या स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार असून अंतिम सामने तेरा ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
सदर प्रसंगी पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, ग्रामीण भागामध्ये आपण प्रथमच असे सुसज्ज क्रीडासंकुल पाहत आहे. येथील क्रीडांगणे, भोजनव्यवस्था व निवासव्यवस्था लाखवेधी असून चांगल्या पद्धतीने आत्मा मालिकने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक, क्रीडा प्रकार या ज्ञानाबरोबरच अध्यात्मिक ज्ञानही ध्यानाच्या माध्यमातून दिले जाते. खेळाडूसाठी ध्यान ही अत्यंत महत्त्वाची बाब असून येथून नक्कीच राष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन समारंभावेळी व्यासपीठावर आत्मा मालिक माउली, ब्रम्हांडानंद महाराज, गणेश महाराज, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त प्रकाश भट, वसंत आव्हाड, विष्णुपंत पवार, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, जाधवभाई पावसीया, प्राचार्य कांतीलाल पटेल, निरंजन डांगे, माणिक जाधव, नामदेव डांगे, संदिप गायकवाड, क्रिडा विभाग प्रमुख अशोक कांगणे आदि उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वीतेसाठी शशेंद्र त्रिपाठी, नितिन सोळके, अजित पवार, गणेश म्हस्के, पद्मराज गायके, तसेच सर्व क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक प्ररिश्रम घेत आहे.