जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

निवडणूक प्रशिक्षणानें कार्य सुलभ होते – निवडणूक निरीक्षक चौधरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव (प्रतिनिधी )

विधानसभा निवडणुक निमित्ताने निवडणूक प्रक्रिया व निवडणूक प्रशिक्षण समजावून आत्मसात केल्यास प्रत्यक्ष मतदान केंद्रस्तरावरचे काम सुलभ होत असल्याचे प्रतिपादन भारत निवडणुक आयोगाचे निवडणूक निरिक्षक हिमांशुज्योती चौधरी यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील २६९ मतदान केंद्रावर प्रत्यक्ष कामकाज पहाणारे सुमारे १५०० मतदान अधिकारी कर्मचारी यांना दूसरे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, इतर मतदान अधिकारी यांचा समावेश होता.भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे वितरण मतदान केंद्राध्यक्ष यांना यावेळी करण्यात आले. त्यावेळी चौधरी हे बोलत होते.

या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके म्हणाले,मतदान प्रकियेत नव्याने दाखल झालेले व्हिव्हिपॅट मशिन हाताळणीचे प्रशिक्षण प्रात्यक्षिका सह आपण घेतले आहे. सदर मशिन इव्हिएम ला कसे जोडायचे व ते कसे काम करते.सदर मशिन हाताळतांना येणा-या अडचणी कशा सोडवायच्या या बाबत मार्गदर्शन केले. व्हिव्हिपॅट मशिन बाबतची एक चलचित्र फित दाखविणेत आली. कर्मचा-यांना व्हिव्हिपॅट सह इव्हिएम प्रत्यक्ष हाताळणीसाठी के.बी.पी.विद्यालयाच्या ३० स्वतंत्र वर्गखोल्या उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.त्यात २० अधिकारी आणि कर्मचारी यांना सुलभ प्रशिक्षण देण्यात आले.त्यात मतदान केंद्रस्तरावरील प्रक्रियेचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रत्येकाचा ४० गुणांचा पेपर घेण्यात आला.
या प्रशिक्षणात कोपरगांव विधानसभा मतदार केंद्रावर कामकाज पहाणारे सर्व शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी महाविद्यालयाचे शिक्षक, शाळांचे शिक्षक यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

सदरच्या प्रशिक्षणात प्रथमत: प्रत्यक्ष मतदान केंद्रावर काम करतांना मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावर पोहचले नंतर प्रथम प्राधान्याने काय काय कामकाज करावे याविषयी सांगितले. तसेच प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी सकाळी मतदान प्रतिनिधींचे उपस्थितीत बनावट मतदान होण्यास प्रतिबंध घालणे.‍ मतदान केंद्र स्तरावर प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवणेत यावे. त्याच वेळेस मतदाराने मतदान केल्यानंतर मतदाराने कोणाला मतदान केले हे मतदारास दिसण्यासाठी मतदान प्रकियेत नव्याने दाखल झालेले व्हिव्हिपॅट मशिन मधून निघणा-या स्लिपा काढून सिल करणे.तीनही मशिन सिल करणे.या मध्ये येणा-या संभाव्य अडचणी, तसेच मतदान प्रक्रिया दिवसभर पार पाडतांना मतदान केंद्रावरील उपस्थित सर्व कर्मचारी यांच्या जबाबदा-या, कर्तव्य या बाबत मार्गदर्शन केले.

उपस्थित सर्व अधिकारी,कर्मचारी व शिक्षक यांनी सदरचे यंत्र हाताळून प्रशिक्षण घेतले. मतदान अधिकारी, कर्मचारी,शिक्षक व सर्व मतदारांसाठी तहसिल कार्यालयात मतदार मदत केंद्रात हाताळणी कामी ठेवण्यात आल्याचे सांगितले. ईव्हीएम व्हीव्हीपँट मशीन ठेवण्यात आल्याचे सांगितले.

याप्रसंगी प्रशिक्षणास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे, निवडणूक शाखेचे अरुण रनणवरे सहाय्यक संतोष नलगे यांचे सह निवडणूक शाखेचे कर्मचारी यांनी सहाय्य केले.
या प्रसंगी टपालाद्वारे होणारे मतदानसाठी स्वतंत्र कक्ष उभारुन अर्ज भरून घेण्यात आले.भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार कोपरगांव विधानसभा मतदार संघातील शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांनी प्रशिक्षणात सहभागी होवून मतदान केंद्रस्तरावरील कामकाजाची शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close