जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

मतांच्या लालसेने बसविले कोपरगाव,शिर्डीकरांच्या मानगुटीवर निळवंडेचे भूत !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-( प्रतिनिधी )

उत्तर नगर जिह्यातील संगमनेर,राहाता,राहुरी,कोपरगाव,श्रीरामपूर,व सिन्नर,अकोले या सात तालुक्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण होऊन या प्रकल्पात गत अकरा वर्षांपासून पाणी साठवले जात आहे.मात्र हे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही.कारण राहाता व कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित राजकारण्यांनी कालव्याचे काम जाणीवपूर्वक अपूर्ण ठेऊन सदरचे पाणी आपल्या दारू कारखान्यांना मिळण्याची व्यवस्था करून ठेवली आहे.त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना खडी फोडण्यासाठी व रोजगार हमीशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही.हा प्रकल्पाला 14 जुलै 1970 साली प्रथम मंजुरी मिळाली मात्र 48 वर्षात 7.93 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आज 2369 कोटी 95 लाख रुपयांवर जाऊन पोहचला तरी याना काम करता आले नाही असे नव्हे तर यांना काम करावयाचेच नाही.हे वारंवार सिद्ध झाले आहे.

निळवंडे हा प्रश्न केवळ निवडणूक काळात मते मिळविण्याचे साधन ठरवला गेला आहे.त्यामुळे या पेक्षा या पुढील काळातही जास्त प्रगती होण्याची शक्यता नाही. यांचा जनता अर्धपोटी असल्यावरच राजाला जास्त काळ राज्य करता येते या आर्य चाणक्याच्या विचारावर गाढ श्रद्धा असल्याने हे मद्य सम्राट त्यांचे शिष्य या तालुक्यातील शेतकऱ्यांना उपाशी पोटी ठेऊन राज्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे.

यांनी स्वतःच्या संस्थांची कामे एवढी वर्षे प्रलंबित ठेवल्याचे एकही उदाहरण नाही.मात्र निळवंडे हा प्रश्न केवळ निवडणूक काळात मते मिळविण्याचे साधन ठरवला गेला आहे.त्यामुळे या पेक्षा या पुढील काळातही जास्त प्रगती होण्याची शक्यता नाही. यांचा जनता अर्धपोटी असल्यावरच राजाला जास्त काळ राज्य करता येते या आर्य चाणक्याच्या विचारावर गाढ श्रद्धा असल्याने हे मद्य सम्राट त्यांचे शिष्य या तालुक्यातील शेतकऱ्यांना उपाशी पोटी ठेऊन राज्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे.आता हेच पहा ना ! हि सत्तांध मंडळी या निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देत नाही म्हणून हा शेतकऱ्यांचा लढा निळवंडे कालवा कृती समितीने अखेर यांच्या मर्कट लीलांना कंटाळून 2006 साली हाती घेतला.व राज्याच्या तत्कालीन आघाडी सरकारच्या जलसंपदाकडून घडलेल्या सत्त्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामुळे या प्रकल्पाला निधी मिळणार नाही हि बाब हेरली व या प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाकडून निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले त्यासाठी आयोगाच्या सतरा मान्यता मिळविणे आवश्यक होते.त्या मिळविण्याचे काम कालवा कृती समितीने दिल्ली पर्यंत स्वखर्चाने पाठपुरावा करून केले.2014 अखेर सतरा पैकी चौदा मान्यता मिळवल्या.एप्रिल 2014 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या व त्यात भाजपचे सरकार सत्तेत समाविष्ट झाले.व त्याच वर्षाच्या ऑक्टोबर माहिल्यात राज्याच्या निवडणूका होऊन राज्यातही भाजपचे सरकार स्थानापन्न झाले.त्यावेळी आमच्या 182 गावातील शेतकऱ्यांच्या खूप अपेक्षा वाढल्या त्यासाठी कृती समितीने सातत्याने उर्वरित तीन मान्यतांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला.मात्र राज्याच्या निवडणुकीत काही काँग्रेसी शुक्राचार्यांनी भाजपच्या तंबूत प्रवेश केला.त्याला कोपरगाव तालुक्यातील मद्यसम्राट सर्वात पुढे होते.त्या पाठोपाठ लोणीकर यांनी मॅनेज विरोधी पक्षाची भूमिका वठविण्यास प्रारंभ केला.हि काँग्रेसची बांडगुळ भाजपवासी झाल्याने त्यांनी आपल्या दारू कारखान्यासाठी निळवंडेचे पाणी पळविण्यासाठीच्या मर्कट लीला या पक्षात आल्यावरही सुरूच ठेवल्या असे नव्हे तर त्याच पापांना झाकण्यासाठी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला होता.

प्रत्येक नागरिकाला अत्यावश्यक असणारे पाणी हा राजकारणाचा विषय होऊ शकतो कोणत्या शहराला किंवा गावाला किती तहानलेले ठेवायचे आणि कोणत्या ठिकाणी मुबलक पाणी असतानाही ते मुद्दाम कमी प्रमाणात देऊन त्याचा धंदा करायचा हे सत्ताधाऱ्यांच्या हाती राहिल्याने राज्यातील शहरामध्ये पाण्याची जी उधळपट्टी सुरु आहे.तिला लगाम घालणे हि राज्य सरकारची प्राथमिक गरज असताना आघाडी सरकार प्रमाणेच भाजपने त्यांचाच कित्ता गिरवणे सुरु केल्यानेच खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोदावरी कालव्याचे पाणी नाशिक जिल्ह्यातील उद्योगांना याच मंडळींनी वाटून दिले.इंडिया बुल्स सारख्या काँग्रेसच्या जावयाला साडे तीन टि. एम.सी.पाणी देऊन पायघड्या अंथरण्याचे पातक केले.नाशिक महापालिकेला त्यांच्या पाण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे सांगण्याचे सोडून यांनी अनिर्बंध पाणी वाटून दिले.प्रत्येक नागरिकाला अत्यावश्यक असणारे पाणी हा राजकारणाचा विषय होऊ शकतो कोणत्या शहराला किंवा गावाला किती तहानलेले ठेवायचे आणि कोणत्या ठिकाणी मुबलक पाणी असतानाही ते मुद्दाम कमी प्रमाणात देऊन त्याचा धंदा करायचा हे सत्ताधाऱ्यांच्या हाती राहिल्याने राज्यातील शहरामध्ये पाण्याची जी उधळपट्टी सुरु आहे.तिला लगाम घालणे हि राज्य सरकारची प्राथमिक गरज असताना आघाडी सरकार प्रमाणेच भाजपने त्यांचाच कित्ता गिरवणे सुरु केल्यानेच खरा प्रश्न निर्माण झाला आहे.निळवंडे धरणाचे कालव्यांचा प्रश्न निळवंडे कालवा कृती समिती मार्फत तेथील प्रसिद्ध वकील अजित काळे यांच्या सहकार्याने उच्च न्यायालयातील न्यायिक लढ्यामुळे (पी.आय.एल.133/2016 ) या मंडळींच्या ताब्यातून हा प्रश्न सुटून चालल्याने हि मंडळी प्रचंड अस्वस्थ झाली आहे.आपल्या दारू कारखान्याचे पाणी कृती समिती काढून घेत असल्याने त्यांची तगमग पाण्यातून बाहेर काढलेल्या माशा सारखी वाढली आहे.त्यामुळे यांनी आता हे पाणी कोपरगाव,शिर्डी या गावांच्या व तिर्थक्षेत्राच्या नावाखाली आपल्या दारू कारखान्यांना पळविण्याचे काम सुरु केले आहे.त्यासाठी निर्णय प्रकियेतील वरिष्ठ हस्तींना हाताशी धरून त्यांना दारू पाजून,त्याना पार्ट्या करून,बाबांच्या दर्शनासाठी व्ही.आय.पी.दर्शनाची सुविधा करून त्यांना काही खोकी सुपूर्त करून निळवंडेच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.याची कालवा समितीच्या कार्यकर्त्यांना चांगली जाणीव आहे.आपल्या दारू कारखान्यासाठी या सत्तान्ध मंडळीने दुष्काळी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पळविण्यासाठी षडयंत्र आखले आहे हे त्यांच्या आज पर्यंतच्या स्वभावाला अनुसरूनच आहे.नाव कोपरगाव,शिर्डीचे पण गाव मात्र यांचे. म्हणून पाणी पळविण्यासाठी हाती पायताण घेतले आहे.याना शेतकऱ्यांच्या व शहराच्या पाण्याची एवढी काळजी होती तर यांनी या पूर्वी असे पायताण अकरा टि. एम.सी. साठी का घेतले नाही.उद्योग वाढीसाठी का घेतले नाही.उलट गोदावरीत बंधारे बांधून त्यांचा निधी सरकारकडून काढून घेतले त्याचा कधी हिसाब-किताब दिला नाही.उलट यांचाच उदो-उदो करून घेतला.गोदावरी कालव्यातून आपल्या कारखानदारीला पूरविण्यात येणाऱ्या द्वाराला कधी कवाडच नव्हते ती बाब माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी उजेडात आणली.कोपरगावातील साठवण तळ्यातील पाणीसाठा राहाता,शिर्डी सारखा नव्वद दिवस पुरणे आवश्यक असताना तो दोन तीन आवर्तनातच संपुन कसा जातो ? हा जलसंपदा नाशिकच्या कार्यकारी अभियंत्यांच्या सवाल यांनी जनतेला कधीच दिला नाही तो तसाच अनुत्तरित का राहीला ? नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी माध्यम प्रतिनिधी समोर पाणी चोरी पकडून दिली त्याचे उत्तर देण्यास या मंडळींनी कायम टाळाटाळ केली.पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी तलाव स्वतः भरून घेतल्यावर एकवीस दिवसाआड मिळणारे शहर आवर्तन तीन-चार दिवसावर कसे आले ? याची उत्तरे जनतेला कधीच मिळण्याची शक्यता नाही.

2 मार्च 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तत्कालीन गोदावरी खोरे मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री सी.ए. बिराजदार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,जिल्ह्याचे पालक मंत्री प्रा.राम शिंदे,जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या व जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत जर निळवंडेच्या लाभक्षेत्राबाहेरील शहरांना (शिर्डी,कोपरगाव ) पाणी दिले तर त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेती सिंचनांचे पाणी कपात होईल ( ते क्षेत्र 12 हजार एकराहून जास्त आहे.)असे स्पष्ट बजावले असताना व त्या बैठकीस राहाता व कोपरगावचे लोकप्रतिनिधी उपस्थित असताना त्यांनी झोपेचे सोंग घेऊन जनतेला वेड्यात काढण्याचे नाटक चालवले आहे.

अशा अविश्वासपात्र राजकीय नेत्यांनी निळवंडेचे भूत मतांच्या लालसेपोटी कोपरगावकरांच्या मानगुटीवर बसवले आहे. 182 गावांना 48 वर्ष मूर्खात काढून झाल्यावर तेथे आता कालवा कृती समिती हा भुसमाल विकून देत नाही म्हणून यांनी मोठा मतांचा गठ्ठा असलेल्या कोपरगाव शिर्डीवर लक्ष केंदित केले आहे हे येथील मतदारांनी समजून घेणे गरजेचे आहे.आता त्यांनी त्यासाठी,” पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक धरणात पंधरा टक्के हक्काचे पाणी असते” अशी बतावणी केली आहे.व शेतीचे पाणी आम्ही घेणार नाही.व कुठलेही शेतीक्षेत्र बाधित होणार नाही अशी शुद्ध खोटी थाप मारली आहे.माझ्या विरुद्ध शेतकऱ्यांना भडकावले. माझ्याविरुद्ध कोर्टात खटले दाखल केले अशा शुद्ध थापा देण्याचा राजरोस धंदा सुरु आहे. 2 मार्च 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तत्कालीन गोदावरी खोरे मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री सी.ए. बिराजदार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,जिल्ह्याचे पालक मंत्री प्रा.राम शिंदे,जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या व जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत जर निळवंडेच्या लाभक्षेत्राबाहेरील शहरांना (शिर्डी,कोपरगाव ) पाणी दिले तर त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेती सिंचनांचे पाणी कपात होईल ( ते क्षेत्र 12 हजार एकराहून जास्त आहे.)असे स्पष्ट बजावले असताना व त्या बैठकीस राहाता व कोपरगावचे लोकप्रतिनिधी उपस्थित असताना त्यांनी झोपेचे सोंग घेऊन जनतेला वेड्यात काढण्याचे नाटक चालवले आहे.यांनी शिर्डी कोपरगावच्या नावावर पाणी मिळविण्यासाठी कसे पत्रव्यवहार करून पाण्यावर दरोडा घालण्याचा प्रयत्न केला त्या बाबतचे पुरावे सप्रमाण पुरावे आहे.व ते माध्यमांना देण्याची समितीची तयारी आहे किंवा आमना-सामना करण्याचे खुले आव्हानच दिले आहे. त्यात 12 हजार हेक्टरचे सिंचन क्षेत्र हे राहाता व कोपरगावच्या तेरा गावांचे कमी होणार आहे.येथेच कोपरगावच्या लोकप्रतिनिधींचा खोटारडेपणा उघड पडत आहे.

कोपरगाव शहरासाठी जलद कालव्यातून पाणी मंजूर असल्याचे पत्र समितीकडे उपलब्ध आहे.पालखेडचे पाणी या साठवण तलावापर्यंत येऊ शकते याचे पुरावे आहेत.साईबाबा कॉर्नर नजीक साठवण तलाव बांधण्यासाठी महसूल सचिवांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहे.भंडारदरा धरणाचे पाणी कसे बंद पेपरमिलच्या नावावर अवैधरित्या कसे वापरले जाते.याचे पुरावे असताना कोपरगावला निळवंडेचेच पाणी का ? याचे उत्तर मद्य सम्राटांच्या कारखान्याची भविष्याची पाणी तरतूद हे आहे.

कोपरगाव शिर्डीला मराठवाडा जलद ( एक्सप्रेस कालवा ) पालखेड कालवा,गोदावरी डावा कालवा, गोदावरी नदी,या खेरीज वाकी,भाम, भावली यांचे पंधरा टक्के पिण्याचे पाणी शिल्लक असताना निळवंडेच्या पाण्यावर डोळा ठेवला आहे.त्यामुळे पिण्याच्या आवर्तनामुळे गोदावरी कालव्यांना जे पाणी येऊन कालवा परिसर हिरवा राहत होता व नजीकच्या विहिरींची भूजल पातळी वाढत होती ती बंद पडून कोपरगाव व राहाता तालुका पूर्ण वाळवंट होणार आहे.मात्र या बाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.साठवण तलाव क्रं. पाच साठी दोन कोटींचा निधी मंजूर असताना,व समृद्धी महामार्गाची गायत्री कंपनी या तलावाचे काम मोफत काम करून देण्यास तयार असताना त्याला सत्तेचा दुरुपयोग करून खोडा घातला आहे.हे सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे.कोपरगाव शहरासाठी जलद कालव्यातून पाणी मंजूर असल्याचे पत्र समितीकडे उपलब्ध आहे.पालखेडचे पाणी या साठवण तलावापर्यंत येऊ शकते याचे पुरावे आहेत.साईबाबा कॉर्नर नजीक साठवण तलाव बांधण्यासाठी महसूल सचिवांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहे.भंडारदरा धरणाचे पाणी कसे बंद पेपरमिलच्या नावावर कसे वापरले जाते.याचे पुरावे असताना कोपरगावला निळवंडेचेच पाणी का ? याचे उत्तर मद्य सम्राटांच्या कारखान्याची भविष्याची पाणी तरतूद हे आहे. हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.सध्याही या नेत्यांची कोपरगाव साठवण तलाव व कालव्यातून होणारी चोरी प्रसिद्धी माध्यमांनी काही महिन्यांपूर्वी सप्रमाण उघड केलेली आहेच.आपल्या कृतीच्या समर्थनार्थ उठता बसता काहींना काही सांगायची पाळी आपल्यावर येते त्याच्या बुडाशी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे अपराधाच्या जाणिवेने त्रस्त झालेले मन आहे हेच राहाता व कोपरगावच्या वर्तमान पुढाऱ्यांच्या कृतीतून सिद्ध झाले आहे.त्यामुळेच ते अनागोंदी, बालिश आरोप, बढाया, भ्रष्टाचार आणि मुख्य म्हणजे खोटारडेपणाचा कळस करीत आहेत.यामुळे या नेत्यांनी निळवंडेचे भूत हे केवळ आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतांच्या बेगमीसाठी कोपरगावकरांच्या मानगुटीवर बसविलेले भूत आहे इतकाच यांचा अन्वयार्थ.त्यामुळे अभासू वाचकांनी व माध्यमस्नेही मंडळींनी हि कागदपत्रे आवश्य वाचावी असे समितीचे आवाहन बरेच काही सांगून जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close