जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दोन कुटुंबांच्या हातात गुरफटलेली सत्ता बाहेर काढण्यासाठीच निवडणुकीच्या आखाड्यात – परजणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

संवत्सर (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात गेल्या पन्नास वर्षापासून दोन कुटुंबांच्या हातात सत्ता गुरफटून पडली असून तिला बाहेर काढण्यासाठी व तालुक्यातील जनतेनेच आता पक्का निर्धार केला असून अपक्ष लढण्याची वेळ आली तरी आता आपण मागे हटणार नाही अशी गर्जना जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी कोपरगांव येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली आहे.
आगामी कोपरगांव विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेत सुरु करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटना निमित्त तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक दुपारी तिच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्र जाधव हे अध्यक्षस्थानी होते. सदर प्रसंगी राजेंद्र जाधव, आंबादास वराडे, एकनाथ संवत्सरकर, वसंतराव दहे आदींसह गोदावरी दूध संघाचे संचालक पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्याला या लढाईत तुम्हाला द्यायला (आर्थिक रसद) काही नाही. तुम्हालाच निवडणुकीसाठी निधी संकलन करावे लागणार आहे.आपण काही प्रस्थापितांसारखे साखर सम्राट नाही.असे राजेश परजणे यांनी म्हणताच वसंत दहे नामक कार्यकर्ता उठून ऊभा राहिला व डाऊच बुद्रुक गावाचे वतीने आपण एक्कावन्न हजार रुपये निवडणूक निधी देऊ व ती गावातील निवडणुकीसाठीच आम्ही वर्गणी गोळा केली असे समजून मदत करू असे आश्वासन दिले.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,कोपरगाव तालुक्यातील जनतेने पन्नास वर्षापासून दोन परिवाराच्या हातात सत्ता दिली. परंतु जनतेचा सतत भ्रमनिरास झालेला आहे. तालुक्याचे हक्काचे पाणी या प्रस्तापित मंडळींना सांभाळता आले नाही. आपले हक्काचे पाणी आपल्या डोळ्यासमक्ष मराठवाड्याकडे जात असताना शेतकऱ्यांना ते पाहण्याशिवाय काहीच करता आले नाही. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांनी ज्येष्ठ नेते आ.गणपतराव देशमुख यांना सोबत घेवून महाराष्ट्रातील वर्तमान आणि भविष्यातील पाण्याच्या संकटाबाबत सखोल अभ्यास करुन पश्चिम घाटमाथ्यावर पडणारे आणि समुद्राला जाऊन मिळणारे पावसाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.लवकरच हा प्रश्न मार्गी लागून नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना या जिल्हातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.

भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहेच. आणि दुर्दैवाने ती मिळाली नाहीच तरीही जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून मी आखाड्यात उतरणार आहे. आतापर्यंत तालुक्यात तिसरा पर्याय नव्हता म्हणून दोन कुटुंबाच्याभोवती सत्ता फिरत होती. जनतेला गुलाम बनवून त्यांच्याच जिवावर मोठ्या झालेल्या संस्थांवर दोन्ही कुटुंबांनी आतापर्यंत राज्य केले. परंतु जनताही आता दुधखुळी राहिलेली नाही. पिळवणूक सहन करण्याची क्षमता आता जनतेमध्ये राहिली नसल्याने या प्रस्तापितांना ते त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही-राजेश परजणे

लोकांनी मला कोपरगांव तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली तर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहे. नामदेवराव परजणे यांनी केवळ आमदारकीसाठी निवडणूक लढविली नव्हती. तालुक्याचे गेलेले वैभव पुन्हा परत आणण्यासाठी हातात सत्ता असावी हा त्यांचा उद्देश होता. परंतु दुर्देवाने त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु आता त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून तालुक्यातून मला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही.

नामदेवराव परजणे यांनी केवळ आमदारकीसाठी निवडणूक लढविली नव्हती. तालुक्याचे गेलेले वैभव पुन्हा परत आणण्यासाठी हातात सत्ता असावी हा त्यांचा उद्देश होता. परंतु दुर्देवाने त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु आता त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून तालुक्यातून मला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही.

भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहेच. आणि दर्दैवाने ती मिळाली नाहीच तरीही जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून मी आखाड्यात उतरणार आहे. आतापर्यंत तालुक्यात तिसरा पर्याय नव्हता म्हणून दोन कुटुंबाच्याभोवती सत्ता फिरत होती. जनतेला गुलाम बनवून त्यांच्याच जिवावर मोठ्या झालेल्या संस्थांवर दोन्ही कुटुंबांनी आतापर्यंत राज्य केले. परंतु जनताही आता दुधखळी राहिलेली नाही. पिळवणूक सहन करण्याची क्षमता आता जनतेमध्ये राहिली नसल्याने या प्रस्तापितांना ते त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वासही श्री परजणे यांनी व्यक्त केला.

प्रारंभी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येवून दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जाधव, आंबादास वराडे, एकनाथ संवत्सरकर, वसंतराव दहे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी तालुक्यातून व शहरातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थितांचे गोदावरी खोरे दूध संघाचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव गुडघे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close