जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दर्जाहीन रस्त्यांची कामे,ठेकेदारांना बजावल्या नोटिसा-वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव शहरात ज्या ठेकेदाराने दर्जाहीन कामे केली असतील त्यांची आपण चौकशी लावू त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही या बाबत पालिकेने अशी कामे करणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत असा खुलासा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे.कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड,बँक रोड,एस.जी.विद्यालय रोड,आचारी हॉस्पिटल रोड व सेन्ट्रल गोडाऊन समोरील रस्त्यांची कामे ही आपण नगराध्यक्ष होण्याच्या आधी झालेली आहेत. त्यावेळची कामाची पद्धत त्यामुळे स्पष्ट होत असून अशा दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत,पण हे करताना तत्कालीन कामाची गुंतागुंत अशी आहे कि कार्यादेश एका ठेकेदाराच्या नांवाने पण प्रत्यक्ष काम करणारा भलताच आहे.पण कार्यादेश ज्याच्या नांवाने तो नगरपरिषदेची इतरही कामे करत असल्याने कारवाई करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.पावसाळ्यात डांबर काम होत नसल्याने दुरुस्तीचे कामे लांबली आहे.आचारी हॉस्पिटल समोरील रस्त्याचे निकृष्ट काम कोल्हे यांच्या माजी नगरसेवकाने केलेले,तेही दुसऱ्याच्या नावावर.हे सर्व रस्ते पुन्हा नव्याने करायचे होते. पण एकदा रस्त्याचे काम झाल्यानंतर लगेच पुन्हा त्याच रस्त्याचे कामावर खर्च करता येत नाही.पण पुढच्या वर्षी मात्र या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून घ्यायचे आहे.कारण साईड गटारी बंद असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने डांबरी रस्ता टिकूच शकत नाही.

आचारी हॉस्पिटल समोरील रस्त्याचे निकृष्ट काम कोल्हे यांच्या माजी नगरसेवकाने केलेले,तेही दुसऱ्याच्या नावावर.हे सर्व रस्ते पुन्हा नव्याने करायचे होते. पण एकदा रस्त्याचे काम झाल्यानंतर लगेच पुन्हा त्याच रस्त्याचे कामावर खर्च करता येत नाही.

बैलबाजार रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे.पावसाळ्यामुळे काम मंदावले आहे.सार्वजनिक वाचनालयाजवळील रस्त्याचे काम व साईनगरमधील रस्त्याचे काम संबंधित ठेकेदार प्रकृती अस्वास्थ्यामुळे काम पूर्ण करू शकलेला नाही.लक्ष्मीनगर रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सुरू आहे.संपूर्ण शहरात 125 कामे सुरू आहेत,प्रस्तावित आहेत.गेल्या सात-आठ वर्षात झाली नव्हती इतकी कामे या पावणेतीन वर्षात पूर्ण झालेली आहेत.

काही दिवसांपूर्वी शहरातील काही रस्त्यांचे भूमिपूजन कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी उरकून घेतले.कोपरगाव नगरपरिषदेला आलेल्या विशेष रस्ता निधीतून ही कामे होत आहेत.पण श्रेय घेण्याची व प्रसिद्धीची चटक लागलेल्या नेत्यांनी नगराध्यक्ष असूनही आपल्याला विचारात न घेता आपली मनमानी करून संकुचित प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे.

काही दिवसांपूर्वी शहरातील काही रस्त्यांचे भूमिपूजन कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी उरकून घेतले.कोपरगाव नगरपरिषदेला आलेल्या विशेष रस्ता निधीतून ही कामे होत आहेत.पण श्रेय घेण्याची व प्रसिद्धीची चटक लागलेल्या नेत्यांनी नगराध्यक्ष असूनही आपल्याला विचारात न घेता आपली मनमानी करून संकुचित प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे. या लोकप्रिय नेत्यांना खरोखरच शहराची काळजी असती तर साईबाबा चौफुली ते संजीवनीचे साम्राज्य हा रस्ता वृक्षांची कत्तल करून आठ कोटी रुपये उधळून चार पदरी करण्याऐवजी शहरातील रस्त्यांसाठी निधी का दिला नाही? त्याचे कारण एकच दिसून येत असून नगराध्यक्ष वहाडणे यांना श्रेय मिळू नये.मात्र कुणी कितीही टिका करा, शहरातील प्रत्येक प्रभागात कामे झाली आहेत व या पूढेही सुरू राहणार असल्याचा निर्धारही वहाडणे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close