कोपरगाव तालुका
कोपरगावात शनिवारी जागतिक मूकबधिर दिन होणार साजरा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातील लायन्स मूक-बधिर व अपंग विद्यालयात येत्या शनिवार दडी. 28 सप्टेंबर रोजी जागतिक मूकबधिर दिन साजरा करण्यात येणार आहे.
देशातील मूक बधिर व अपंग विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती वाढावी,व समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने 28 सप्टेंबर रोजी जागतिक मूकबधिर दिन साजरा करण्यात येत असतो.कोपरगावातील लायन्स मूकबधिर विद्यालयात या दिना निमित्त कोपरगाव शहरात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील मूक बधिर व अपंग विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती वाढावी,व समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने 28 सप्टेंबर रोजी जागतिक मूकबधिर दिन साजरा करण्यात येत असतो.कोपरगावातील लायन्स मूकबधिर विद्यालयात या दिना निमित्त कोपरगाव शहरात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.या फेरीचे उदघाटन महात्मा गांधी चौकात कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे हे करणार आहेत.या कार्यक्रमास कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे ,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर ,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव संजीव कुलकर्णी,लायन्स क्लबचे अध्यक्ष विजय शेटे ,संदीप रोहमारे आदींनी केले आहे.