जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

निवडणूक कक्षात नामनिर्देशन भरताना फक्त पाच जणांनाचं प्रवेश !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव (प्रतिनिधी)राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून नामनिर्देशन भरण्यास आजपासून सुरुवात झाली असून या निवडणुकीत नामनिर्देशन भरण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक कक्षात प्रवेश करताना उमेद्वारासह केवळ पाच कार्यकर्त्यांनाच प्रवेश करता येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी राहुल मुंडके यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.सदर प्रसंगी ते पुढे म्हणाले कि,२१९ कोपरगांव विधानसभा निवडणूक नामनिर्देशन पत्र भरणे प्रक्रिया शुक्रवार दि.२७ सप्टेंबर पासून सकाळी ११:०० वा. ते दुपारी ३:०० वा.पर्यंत सुरु करण्यात येत आहे. या संदर्भात भारत निवडणूक आयोग यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतांना उमेदवार व संबंधित यांना खालील प्रमाणे काही सुचना दिल्या आहेत.

उमेदवार यास नामनिर्देशन पत्र दाखल करतांना कार्यालयाचे आत जास्तीत जास्त तीन वाहने आणता येतील. तसेच उमेदवाराला प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल कक्षात उमेदवार आणि ईतर फक्त चार असे पाच लोकांना सोबत ठेवता येईल.प्रत्येक उमेदवाराने आपले खर्च संदर्भात राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत नव्याने खाते उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे एक दिवस अगोदर उघडून घेण्याची गरज आहे. उमेदवाराचा दैनंदिन खर्च आवश्यक कागदपत्रासह दररोज सादर करणे बंधनकारक आहे.

यात उमेदवार यास नामनिर्देशन पत्र दाखल करतांना कार्यालयाचे आत जास्तीत जास्त तीन वाहने आणता येतील. तसेच उमेदवाराला प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल कक्षात उमेदवार आणि ईतर फक्त चार असे पाच लोकांना सोबत ठेवता येईल.प्रत्येक उमेदवाराने आपले खर्च संदर्भात राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत नव्याने खाते उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे एक दिवस अगोदर उघडून घेण्याची गरज आहे. उमेदवाराचा दैनंदिन खर्च आवश्यक कागदपत्रासह दररोज सादर करणे बंधनकारक आहे. तहसिल कार्यालयाच्या शंभर मिटरच्या आत नामनिर्देशन पत्र स्विकारण्याच्या निर्धारित वेळेत (शुक्रवार दि.२७ सप्टेंबर ते शुक्रवार दि.४ आँक्टोबर पर्यंत सकाळी ११:०० वा. ते दुपारी ३:०० वा.पर्यंत उमेदवार आणि सोबतचे चार लोकांव्यतिरिक्त ईतर नागरिकांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे.मात्र निर्धारित वेळेच्या व्यतिरिक्त कामकाज सुरु राहणार आहे.तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी. कोपरगांव विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन स्विकारणेसाठी आवश्यक सर्व तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.सदर प्रसंगी सहाय्यक निवडणूक अधिकारी योगेश चंद्रे हे हि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close