जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील…या गावातील लाभार्थी रेशनपासून वंचित !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कुभांरी-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुभांरी येथील लाभार्थी रेशनदारक लाभापासून वंचित असून त्यानां कुभांरी येथील शासनाच्या पुरवठा विभागा मार्फत महिला बचत गटाच्या वतीने वाटप केली असताना हा पुरवठा पुरवठा विभागाने बंद केल्याने या नागरिकांची चिंता वाढली असून सरकारने सदरचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे.

बचत गटाचा पुरवठा नुकताच दि.२९ मार्च पासून पूर्वचुचना न देता बंद केला आहे.काही लाभार्थी यानां माहिती नसल्याने सोमवारी या दुकानासमोर वंचित लाभार्थी याची महिला व वुद्ध सकाळपासून या दुकानासमोर रागेत उभे होते.कुभांरी परिसरातील तीन ते चार कि.मी.च्या परिसरातून उपाशी-तापाशी आले असल्याचे दिसून आले आहे.त्यांना कुभांरी येथील बचत गटाच्या महिलांनी सागितले पुरवठा बंद झाला आहे.आम्ही तुम्हाला संदेश टाकले आहे.अनेक लोक महिला अशिक्षित असल्याने या संदेशाचा बोध झाला नाही.किंवा पोहचला नाही.त्यांना निरोप पोहचला नसल्याने येथील पुरवठा वेळेत संपर्क यंत्रणा नसल्याने बंद असते त्यामुळे त्याचा फटका लाभार्थी यांना बसतो.एकिकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात जास्तीत जास्त रेशन दुकान चालू ठेवा एकिकडे कोरोना महामारी कोरोनाने पून्हा एकदा डोके काढले आहे त्यामुळे रोजगार गेला असुन जे काही थोडे अन्य धान्य मका,तांदुळ दाळ,साखर कमी पैशामध्ये व दारिद्र्य रेषेखालील लोकांना शासन मोफत देते कुभांरी येथील लाभार्थी यांनी आ.आशुतोष काळे व तहसीलदार योगेश चंद्रे यांनी प्रकरणी लक्ष घालून कुभांरी येथील रेशन दुकानास मुदत वाढ द्यावी व नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी या महिलांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close