कोपरगाव तालुका
सरकारने किरकोळ व्यापाऱ्यांवर केला अन्याय,..या व्यापारी नेत्यांचा आरोप
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच सरकारने ३० एप्रिल प्रयन्त टाळेबंदी जाहीर केल्याने संपादक,उद्योजक,चित्रपट निर्माते,भांडवलदार आदींना विश्वासात घेतले मात्र छोट्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेतलेले नसून यातून छोट्या व्यापाऱ्यामधील अनेक घटकांवर अन्याय झाला असून छोटे टायर पंचर दुकान चालक,मोबाईल विक्रेते,इलेकट्रॉनिक्स,इलेक्ट्रिक,बॅटरी,स्पेअर पार्ट,नाभिक,सुवर्णकार,चर्मकार,हॉटेल,गॅरेज चालक आदींवर अन्याय झाला असून या घटकांचा सरकारने सहनुभुतीपूर्वक विचार करावा अशी मागणी कोपरगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी नुकतीच केली आहे.
“कोपरगावात आज सकाळ पासून टाळेबंदीची अमलबजावणी सुरु झाली असून याचा पहिला दणका छोटे टायर पंचर दुकान चालक,मोबाईल विक्रेते,इलेकट्रॉनिक्स,इलेक्ट्रिक,बॅटरी,स्पेअर पार्ट,नाभिक,सुवर्णकार,चर्मकार,हॉटेल,गॅरेज चालक व विविध उत्सवानिमित्त काही छोट्या चीजवस्तू बनवणाऱ्या ग्रामीण कारागिरांना व तत्सम व्यापाऱ्यांना बसला आहे त्यांना यातून सूट द्यावी”ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष व्यापारी महासंघ कोपरगाव.
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.राज्यात चाळीस हजाराहून जास्त कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरंगाव तालुक्यातुन नगरला तपासणी साठी ८८ श्राव पाठवले असून तेथून तपासून आलेल्या अहवालात ३५ बाधित रुग्ण आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून तपासणी केलेल्या अहवालात ३३ तर एकूण रॅपिड टेस्ट २२० रॅपिड टेस्ट करण्यात येऊन त्या मधून ६९ असे एकूण १३७ रुग्ण बाधित आढळल्याने व चार दिसत दहा नागरिकांचे बळी गेल्याने कोरोनाचा वाढणारा विक्रम थांबत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.त्यामुळे राज्य सरकारसह कोपरगाव तालुका प्रशासन हादरले आहे.त्यामुळे या साथीला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली आहेत.हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही कडक निर्बंध लावणे बाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक ४ एप्रिल २०२१ नुसार “ब्रेक द चेन” मिशन अंतर्गत दिनांक ५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ या दरम्यान जमावबंदी लागु केला आहे.या दरम्यान ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येवू शकणार नाहीत याची खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.त्याची आज सकाळ पासून अमलबजावणी सुरु झाली असून याचा पहिला दणका छोटे टायर पंचर दुकान चालक,मोबाईल विक्रेते,इलेकट्रॉनिक्स,इलेक्ट्रिक,बॅटरी,स्पेअर पार्ट,नाभिक,सुवर्णकार,चर्मकार,हॉटेल,गॅरेज चालक व विविध उत्सवानिमित्त काही छोट्या चीजवस्तू बनवणाऱ्या ग्रामीण कारागिरांना व तत्सम व्यापाऱ्यांना बसला आहे.त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून याबाबत कोपरगाव शहर व तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी दिली असून त्यांनी शासनाच्या या कृतीचा निषेध केला असून या आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी याबाबत एक चलचित्रण फित सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित केली असून यात हा आरोप केला आहे.त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”सरकारने नुकतीच दुसरी टाळेबंदी जाहीर केली असून कोरोना नियंत्रणात आणण्यास केलेली कृती समर्थनीय असून यात मात्र छोट्या व्यापाऱ्यांना विचारात घेतलेले नाही.हे एक आश्चर्य आहे.एखाद्या किराणा दुकानात फार तर दोन किंवा तीन ग्राहक येतात.त्यांच्या पासून कोरोनाचा प्रसार कसा होऊ शकतो असा सवाल करत राजकीय मेळावे,निवडणुका,अंत्यविधी,लग्न,वाढदिवस,सुपाऱ्या आदीं कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने कोरोनाचा प्रसार होतो मात्र ते सुरु ठेवले असून छोट्या व्यापाऱ्यांना मात्र सरकारने विश्वासात घेतले नाही याबाबत त्यांनी काळजी व्यक्त केली आहे.या छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानात दोन-तीन ग्राहकांना परवानगी का देण्यात येऊ नये असा रास्त सवाल केला आहे.व याला जबाबदार ठरवताना व्यापाऱ्यांची असंघटितपणा जबाबदार असल्याचे म्हटले असून यावर त्यांनी या घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले असून त्यांनी व्यापारी महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.व याला संघटनात्मक मार्गाने न्याय मिळवता येऊ शकतो असा दिलासा या व्यापाऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे.व या व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,सचिव प्रदीप साखरे यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.व याबाबत लवकरच काही तरी कृती करावी लागणार असल्याचे सुतोवाच केले आहे.