कोपरगाव तालुका
डाऊच हद्दीत दरोडेखोरांकडून सव्वासहा लाखांची लूट,अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्यावर डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यानीं मारुती एर्टीगा कारचा वापर करत भिवंडीहून औरंगाबाद कडे लातूर जिल्ह्यातील आठ म्हशी घेऊन चाललेला विटकरी रंगाचा आयशर (क्रं. एम.एच.05,डी. के.757)ट्रक सह सहा लाख 23 हजार पाचशे रुपयांच्या ऐवजासह सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लुटला असून आरोपी ट्रक सह फरार झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,लातूर जिल्ह्यातील वरील क्रमांकांचा आयशर ट्रक वरील चालक हज्जू अमीन शेख (वय-22) रा.लामजमा ता.औसा जिल्हा लातूर हा भिवंडी येथून खरेदी केलेल्या प्रत्येकी पंचवीस हजार किमतीच्या एकूण दोन लाख रुपये किमतीच्या आठ म्हशी घेऊन औरंगाबादकडे मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-नागपूर राज्य मार्गाने जात असताना त्याला कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत आल्यावर एक पांढऱ्या रंगाच्या एर्टीगामध्ये चार अनोळखी आरोपींनी येऊन ती रस्त्यात आडवी घालून चालकास कोयता व अन्य हत्यारांचा धाक दाखवून त्यातील आठ म्हशी,चार लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक,अठरा हजार रुपये रोख,पाचशे रुपये किमतीचा मोबाईल,असा सहा लाख 23 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला आहे.या घटनेची ट्रक चालक हज्जू शेख याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर देऊन गुन्हा क्रं.320/2019 भा.द.वि.कलम 341,363,394,504,506 प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.