कोपरगाव तालुका
“टू प्लस”गुन्हेगारांनीं वर्तनात सुधारणा करणे गरजेचे-पोलीस निरीक्षक देसले
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमान काळातील गुन्हेगारांनी आपल्या वर्तनात सुधारणा केल्यास त्यांना “टू प्लस” च्या गुन्हेगारीच्या वर्तुळातून सहज बाहेर पडता येईल असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“टू प्लस” योजनेअंतर्गत अन्य सराईत गुन्हेगारांचा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या दोनशे टोळ्यांची माहिती नगर जिल्हा पोलिसांनी संकलित केली आहे.या सर्व माहितीवर एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्यामुळे आता एका क्लिकवर सराईत गुन्हेगारांची माहिती पोलिसांना मिळणार आहे.पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे सोलापूर येथे कार्यरत असताना त्यांनी तेथेही टू प्लस योजना प्रातिनिधिकपणे यशस्वीरित्या राबविली होती.
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ही योजना अतिशय उपयुक्त असल्याने राज्यातील इतर जिल्ह्यातही ही योजना आगामी काळात राबवली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या टू-प्लस योजनेअंतर्गत पोलिसांनी ०२ हजार ६४० गुन्हेगारांची यादी अद्ययावत केली आहे.दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगारांचे पोलीस ठाणेनिहाय मेळावे घेऊन त्यांचे प्रबोधन करतानाच पुन्हा गुन्हे कराल तर खैर नाही अशी तंबीही दिली जात आहे. राज्यातील हे पथदर्शी अभियान असणार आहे.त्या योजनेअंतर्गत आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आज या यादीवरील २३ गुन्हेगारांची बैठक कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात अली होती त्या वेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे,कनिष्ठ अधिकारी,कामगार पोलीस पाटील,बिट अंमलदार,आदी मान्यवर उपस्थित होते.सदर प्रसंगी “टु प्लस” यादीतील गुन्हेगारांचे सर्व दृष्टिकोनातून छायाचित्र घेण्यात आले आहेत तसेच सदर गुन्हेगारांना त्यांचेवर दाखल असणारे गुन्हयाची त्यांना जाणीव करुन दिली असुन सदर गुन्हयामुळे त्यांना समाजात जिवन जगताना अपमानीत झाल्यासारखे वाटत असेल पुन्हा चांगले जीवन जगण्यासाठी गुन्हयाची पार्श्वभुमीतुन बाजुला कसे निघता येईल त्या बाबत काय करायला पाहिजे अशी माहीती देवुन गुन्हेगारांना सुधारण्यासाठी योग्य ते समुपदेशन केले आहे.त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”चांगल्या कामासाठी पोलीस नेहमीच तुमच्या मदतीसाठी तयार राहतील याची त्यांना जाणीव करुन दिली व गुन्हेगारांचे वर्तनात सुधारणा होणे करीता तसेच भविष्यात त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळु नये सोबतच कायद्याच्या चाकोरीत राहूनच जिवन जगण्याचा सल्ला शेवटी उपस्थित आरोपींना दिला आहे.