जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात लाखो रुपये खर्चुनही बाजार ओटे धूळखात पडून,भलतेच उद्योग तेजीत-नगरसेविकेचा आरोप

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेने लाखो रुपये खर्चून बाजारातील व्यापाऱ्यांना ओटे बांधून दिले आहे ते काम पूर्ण झाले असतानाही दुर्दैवाने त्यांचा आजही वापर होत नसून त्या ठिकाणी भलते-सलते उद्योग तेजीत असल्याने त्याकडे पालिका व पोलीस प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या नगरसेविका सपना मोरे यांनी नुकतेच केले आहे.

कोपरगाव शहरातील लक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या बाजार ओट्यांचे पूर्वीचे छायाचित्र

दरम्यान याबाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”या ठिकाणी अनेक वेळा आपण व प्रशासनाने व्यापाऱ्यांना प्रयत्नपूर्वक बसविण्याचा प्रयत्न केला पण पण व्यापारी त्याला दाद देत नाही,त्या ठिकाणी व्यवसाय होत नाही अशी त्यांची तक्रार आहे,आता त्या ठिकाणी अनेक नियमबाह्य उद्योग सुरु असल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे” याबाबत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.

कोपरगाव नगरपरिषदेने शहराच्या काले मळ्याच्या पूर्व बाजूस साधारण दोन वर्षांपूर्वी साधारण ०१ कोटी ८८ लाख रुपये खर्चून आठवडे बाजारात येणाऱ्या बाजारकरू व्यापाऱ्यांना दीडशे बाजार ओटे बांधून दिले मात्र अद्याप त्यांचा वापर होत नसल्याने त्या ठिकाणी काही तरुण जोडपे दुरुपयोग करत असल्याने याबाबत त्या प्रभागाच्या नगरसेविका सपना भरत मोरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

त्या बाबत त्यांनी आमच्या प्रतिनिधीस प्रसिद्धीपत्रक देऊन त्यात या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”सदर रस्ता हा शहर नियोजनात फार पूर्वीपासून मंजूर आहे.चाळीस फूट रुंद हा रस्ता गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.गेल्या सत्तर वर्षात आठवडे बाजार हा पूर्वीच्या बाजारतळावर भरतो. मात्र वाढत्या लोकसंख्यामुळे ती जागा कमी पडते.त्यामुळे बाहेरून येणारे छोटे छोटे व्यापारी आता येणे बंद झाले आहे.आपले गांव तालुका पातळीचे असूनही त्याचे स्वरूप गावखेड्यासारखे दिसत आहे.परिणामी शहराची बाजारपेठ ओसाड पडली आहे.मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून जे बाजार ओटे बांधले ते धूळ खात पडून आहे.रात्री तेथे दुसरेच उद्योग बहरात आले आहे.याचा प्रत्यय रोजच सप्तर्षी मळ्यातील,काले मळ्यातील नागरिकांना येतो आहे.सदर रस्ता झाल्याने जुने गावठाण व परिसरातील लोकांना जो रहदारी चा त्रास दर सोमवारी सहन करावा लागतो त्यापासून त्यांना दिलासा मिळेल व बाहेरून येणारे व्यापारी वाढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे व मुख्य रस्त्यावर होणारी कोंडी टाळता येईल.बाकी जनता सूज्ञ आहे त्यांना कशासाठी राजकारण चालू आहे हे कळतंय येणाऱ्या काळात जनता धडा निश्चितच विरोध करणाऱ्यानां धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.नगरसेवक आणि शिवसैनिक म्हणून मी नागरिकांचे हित जपण्यासाठी आपण नेहमीच कटिबध्द आहे.आपण जनसेवेचा घेतलेला वसा आपण पुर्ण करणार आहे.विरोध करणारे केवळ पाच टक्केच आहेत पण निष्ठेने काम करणा-या सोबत ९५ टक्के जनता आहे.त्यामुळे नुकसान माझ्या प्रभागाचं होते आहे हे आता आमचे मतदार चांगलेच ओळखून आहे असल्याचे नगरसेविका सपना मोरे यांनी शेवटी म्हटले आहे.

दरम्यान याबाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”या ठिकाणी अनेक वेळा आपण व प्रशासनाने व्यापाऱ्यांना प्रयत्नपूर्वक बसविण्याचा प्रयत्न केला पण पण व्यापारी त्याला दाद देत नाही,त्या ठिकाणी व्यवसाय होत नाही अशी त्यांची तक्रार आहे,आता त्या ठिकाणी अनेक नियमबाह्य उद्योग सुरु असल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे” याबाबत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close