कोपरगाव तालुका
कोपरगाव पालिकेचे ४५.७१ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक सादर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव नगरपरिषदेचे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सादर केले असून कोपरगांव नगरपरिषदेने ४५ लाख ७१ हजार २१३ इतक्या शिल्लकेचे अंदाजपत्रक सादर केले असून यात महसुली व भांडवली जमा १९१ कोटी ११ लाख ५६ हजार अपेक्षित ठेवले असून मागील वर्षीय शिल्लक लक्षात घेता २२१ कोटी ३०लाख १६ हजार २१३ इतक्या रक्कमेच्या खर्चास अनुमती दिलेली आहे.
एकाच वेळी बांधण्यात आलेले तुळजाभवानी व्यापारी संकुलातील गाळे विक्री झाली मात्र बाबूलाल वाणी फ्रुट मार्केटचे गाळ्यांचे लिलाव का झाले नाही असा रास्त सवाल उपस्थित केला आहे.व त्यातील त्रुटी सभागृहाच्या निदर्शनास आणल्या आहेत.भांडवली मूल्य धरताना या व्यापारी संकुलात समोरील पटांगणात केलेले काम व मागील बाजूची भिंत आदींचे कामही यात गृहीत धरल्याने याचे मूल्य अव्वाच्या सव्वा दर्शवले गेले त्यामुळे आज ३०-३२ व्यापारी गाळ्यांचे बांधकाम मूल्य प्रचंड वाढले गेले आहे ते सामान्य व्यापाऱ्यांच्या आवाक्यात राहिले नाही-संदीप वर्पे,विरोधी नगरसेवक.
कोपरगाव नगरपरिषदेचे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजपत्रकीय सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी हा अर्थ संकल्प मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सादर केला आहे.त्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वागत केले आहे.
सदर प्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वर्पे,मंदार पहाडे,योगेश बागुल,अनिल आव्हाड,आरिफ कुरेशी,ऐश्वर्या सातभाई,प्रतिभा शिलेदार,आदींसह बहुसंख्य नगरसेवक उपमुख्याधिकारी गोर्डे विभागीय अधिकारी उपस्थित होते.सदर प्रसंगी अंदाज पत्रकात कर्मचारी यांचे वेतन व सेवानिवृत्त वेतनाचा खर्च १२ कोटी ४५ लाख ७५ हजार व त्याच प्रमाणे सार्वजनिक सुरक्षितता,आरोग्य, शिक्षण व संकीर्ण इ. सर्व विभागाचा आवश्यक खर्च १४ कोटी ०६ लाख ४० हजार इतका गृहीत धरला आहे. त्याच प्रमाणे भांडवली खर्च १९४ कोटी ३२ लाख ३०हजार गृहीत धरला आहे. त्यात प्रामुख्याने हद्दवाढ विकास योजना,प्रधानमंत्री आवास योजना,अमरधाम बांधकाम,सौर उर्जा प्रकल्प, नाट्यगृह बांधकाम व व्यापारी संकुल तसेच शासनातर्फे मिळणाऱ्या १४ वा वित्त आयोग,१५ वा वित्त आयोग, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (जिल्हास्तर व राज्यस्तर), रस्ता निधी व विशेष रस्ता निधी अंतर्गत शहरातील रस्ता सुधारणेकामी तसेच वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत क्रिडांगण,बगीचे सौंदर्यीकरण व केंद्र शासनाद्वारे बायोगॅस प्रकल्प या सारखे शहरातील विकासाची कामे करणेकामी उपरोक्त योजने अंतर्गत विविध विकास कामाचे नियोजन करण्यात आले आहे.दरम्यान यावेळी उत्पन्न वाढीचा विषय आला त्यावेळी नगरसेवक संदीप वर्पे यांनी उत्पन्न वाढीचा विषय चर्चेत आला तेंव्हा गत सहा वर्षापासून बंद असलेल्या फ्रुट मार्केटचा विषय उपस्थित करून पालीकेचे होत असलेले नुकसान सभागृहाच्या निदर्शनास आणले आहे.एकाच वेळी बांधण्यात आलेले तुळजाभवानी व्यापारी संकुलातील गाळे विक्री झाली मात्र बाबूलाल वाणी फ्रुट मार्केटचे गाळ्यांचे लिलाव का झाले नाही असा रास्त सवाल उपस्थित केला आहे.व त्यातील त्रुटी सभागृहाच्या निदर्शनास आणल्या आहेत.भांडवली मूल्य धरताना या व्यापारी संकुलात समोरील पटांगणात केलेले काम व मागील बाजूची भिंत आदींचे कामही यात गृहीत धरल्याने याचे मूल्य अव्वाच्या सव्वा दर्शवले गेले त्यामुळे आज ३०-३२ व्यापारी गाळ्यांचे बांधकाम मूल्य प्रचंड वाढले गेले आहे.ते व्यापारी व सामान्य माणसाच्या आवाक्यात राहिले नाही.त्यामुळे पालिकेचे गत सहा वर्षापेक्षा अधिक काळापासून सुमारे ३०-३५ लाखांचे नुकसान झाले आहे.दोन वेळा लिलाव पुकारूनही कोणी लिलाव घेतले नाही हि गंभीर बाब आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी,प्रांत,मुख्याधिकारी यांची त्रिसदस्यीय समितीने ठरवलेले मूल्य चुकीचे असल्याचे निदर्शनास आणले आहे.व त्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे जावे लागेल अशी सूचना मांडली आहे.व त्यातून मार्ग निघाला तर पालिकेचे दीड ते दोन कोटींचे उत्पन्न वाढेल असा दावा केला आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्यास नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी संमती दर्शवली आहे.या वेळी वर्पे यांनी कोपरगाव येथील दानवगुरु शुक्राचार्य तीर्थक्षेत्र विकासाचा मुद्दा उपस्थित केला त्या साठी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचे वहाडणे यांनी जाहीर केले आहे.त्यासाठी अनिल आव्हाड यांनी आपल्याला यात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले त्याला त्यांनी दुजोरा दिला आहे.त्यावेळी या चर्चेत नगरसेवक मेहमूद सय्यद,संजय पवार,आरिफ कुरेशी,मंदार पहाडे,महिला नगरसेवक आदींनी सहभाग नोंदवला आहे.