जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात बांधाच्या कारणावरून हाणामारी,चौघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीतील फिर्यादीचा पती हा उसाची लागवड करत असताना यातील आरोपी शरद अरविंद नाईक,सुनील अरविंद नाईक,शशिकांत मुरलीधर बनकर,गोटूराम शशिकांत बनकर यांनी बांधाची माती निघाली या कारणावरून यातील फिर्यादी हिचे उजव्या हाताच्या पंजावर व मनगटावर तसेच पाठीवर काठीने मारहाण करून जखमी केले तसेच फिर्यादीचे पतीस व फिर्यादिस यातील आरोपीत मजकूर यांनी लाथाबुक्यांने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी उज्वला प्रमोद देशमुख (वय-३५) यांनी दाखल केली आहे.त्यामुळे ब्राम्हणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला उज्वला देशमुख व आरोपी शरद नाईक यांची ब्राम्हणगाव शिवारात शेजारी-शेजारी शेतजमीन असून फिर्यादी महिलेचा पती प्रमोद देशमुख हे उसाची लागवड करीत होते.त्यावेळी त्यांच्याकडून हि लागवड करताना शेताच्या बांधाची माती निघाली या किरकोळ कारणावरून फिर्यादी महिलेच्या उजव्या हाताच्या पंजावर मनगटावर तसेच पाठीवर आरोपी शरद नाईक याने व सुनील नाईक याने काठीने मारहाण करून जखमी केले आहे.

सदरची सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला उज्वला देशमुख व आरोपी शरद नाईक यांची ब्राम्हणगाव शिवारात शेजारी-शेजारी शेतजमीन असून फिर्यादी महिलेचा पती प्रमोद देशमुख हे उसाची लागवड करीत होते.त्यावेळी त्यांच्याकडून हि लागवड करताना शेताच्या बांधाची माती निघाली या किरकोळ कारणावरून फिर्यादी महिलेच्या उजव्या हाताच्या पंजावर मनगटावर तसेच पाठीवर आरोपी शरद नाईक याने व सुनील नाईक याने काठीने मारहाण करून जखमी केले आहे.तसेच फिर्यादी महिलेचा पती प्रमोद देशमुख यांना व फिर्यादी महिलेला यावरील आरोपीनी लाथा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.६८/२०२१,भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी शरद अरविंद नाईक,सुनील अरविंद नाईक,शशिकांत मुरलीधर बनकर,गोटूराम शशिकांत बनकर याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. एम.आंधळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close