जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात खोका शॉपचा मार्ग होणार पुन्हा खुला !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी खोकाशॉप व गाळे बांधण्यासाठी मान्यता मिळावी यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह शिष्टमंडळाने सहाय्यक संचालक,नगर रचना व मुल्य निर्धारण विभाग अहमदनगर यांची आज भेट घेतली असून शहरातील सुशिक्षित-अशिक्षित बेरोजगार,छोट्या व्यावसायिकांना, विस्थापितांना जास्तीतजास्त खोका शॉप उपलब्ध व्हावेत यासाठी चर्चा करण्यात आली आहे.

कोपरगाव शहरात १० मार्च सन-२०११ रोजी शहरातील अतिक्रमणे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत हटविली.त्यात सुमारे दोन हजाराहुन अधिक नागरिकांची रोजी रोटी हिसकावली गेली त्या वेळेपासून हा प्रश्न प्रत्येक निवडणूक पाहून राजकीय नेते आपल्या मतपेट्या भरण्यासाठी वापरत आहे.मात्र कोणीही हा प्रश्न ऐरणीवर घेतला नाही.आता निवडणुका जवळ आल्यावर पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला असल्याने त्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोपरगाव शहरात १० मार्च सन-२०११ रोजी शहरातील अतिक्रमणे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत हटविली.त्यात सुमारे दोन हजाराहुन अधिक नागरिकांची रोजी रोटी हिसकावली गेली त्या वेळेपासून हा प्रश्न प्रत्येक निवडणूक पाहून राजकीय नेते आपल्या मतपेट्या भरण्यासाठी वापरत आहे.मात्र कोणीही हा प्रश्न ऐरणीवर घेतला नाही.आता जवळपास सर्वच विस्थापित परागंदा झाले असताना हा विषय नगराध्यक्ष वहाडणे यांनी हातात घेतला असून त्यासाठी सम्बधीत अधिकाऱ्यांची आज वेळ घेतली होती.व नागरिकांना या बैठकीस उपस्थित रहाण्याचे आवाहन केले होते.ती बैठक आज दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी गटनेते भाजपचे रविंद्र पाठक,उपनगराध्यक्ष निखाडे,संदिप वर्पे,मेहमूद सय्यद,जनार्दन कदम,मंदार पहाडे,कैलास जाधव,विनायक गायकवाड व सहकारी,कनिष्ठ अभियंता बडगुजर,व्यापारी संघटना आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बाजारतळ येथे खोका शॉपसाठी मान्यतेची केवळ औपचारिकता उरलेली आहे.काँग्रेस कमिटी जवळ,धारणगाव रोड,पुनम थिएटर समोर,एस.जी.विद्यालय भिंतीलगत,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ,टिळक नगर शॉपिंग जवळ,येवला रोड,बुब हॉस्पिटल जवळ इ.ठिकाणी खोका शॉपसाठी परवानगी द्यावी अशी मागणी सर्वांनीच केली.पण फक्त नगरपरिषदेच्या मालकी असलेल्या जागेवरच परवानगी (मान्यता) मिळेल असे उत्तर सहाय्यक संचालक श्री.बागुल व श्री.पवार आदींनी दिले आहे.
आता यानंतर खोका शॉपसाठी अजून काय करता येईल यावर निर्णय घेण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठक घेऊन चर्चा विचारविनिमय करावा लागणार आहे.यासाठी एखादी सर्वसमावेशक समिती स्थापन करावी लागणार आहे.लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
पण कृपया या विषयावर सामाजिक संकेतस्थळे किंवा बातम्यांद्वारे कुणीही आरोप-प्रत्यारोप करू नयेत.ज्यांना याबाबत काही सुचवायचे असेल तर लेखी कळवावे किंवा प्रत्यक्ष चर्चा करावी.शहरातील व्यापारी नागरिक व रहदारीला अडथळा होणार नाही याचे भान ठेवावे लागणार असल्याचे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close