कोपरगाव तालुका
कोपरगावातील शिंगी-शिंदें नगरातील जलकुंभास नामाभिदान जाहीर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपल्या अधिकारात असलेल्या आयत्या वेळच्या विषयांत कोपरगाव नगरपरिषदेच्या दोन जलकुंभाच्या नामकरणाचा विषय मांडला मांडला असून हा नामकरण विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
नूतन नामकरणात यात शिंदे शिंगी नगर येथील जलकुंभास “भगवान महावीर जलकुंभ” वडांगळे वस्ती-स्टेशन रोड जलकुंभास ” नेताजी सुभाषचंद्र बोस जलकुंभ”नाव देण्यात आले आहे.तर गोदावरी लहानपुल ते शुक्राचार्य मंदिर(बेट) रस्त्याचे” परम सद्गुरू श्री.शुक्राचार्य महाराज पालखी मार्ग”अशी नांवे देण्याचा सर्वानुमते निर्णय झाला आहे.यापुर्वी गोरोबा नगर जलकुंभाचे”श्री संत गोरोबाकाका जलकुंभ” असे नामकरण तर समता नगर जलकुंभाचे” क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले”असे नामाभिदान झालेले आहे.कोपरगाव साई बाबा कॉर्नर जवळ असलेल्या नगरपरिषदेच्या जलकुंभ जलशुद्धीकरण केंद्र जलकुंभास” स्व.बाळासाहेब सातभाई जलकुंभ”यांचे नाव आधीच देण्यात आले आहे.तर ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलकुंभ”, ” पं. दीनदयाळ उपाध्याय अग्निशमन केंद्र”, “आद्य क्रांतिकारक राधोजी भांगरे” बाजार ओटे,असे नामकरण केलेले आहे.सामाजिक,राष्ट्रीय भान ठेवून सर्वसमावेशक नामकरण करण्यात आलेले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे