कोपरगाव तालुका
कोपरगावात वाळूच्या जप्त वाहनांचा होणार लिलाव
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोदापात्रातील अवैध वाळू उत्खनन व वहातुक करणाऱ्या मात्र तहसीलदार तथा महसूल विभागाने विविध ठिकाणी जप्त केलेल्या विविध वाहनांचा लिलाव दि.०२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव तहसील कार्यालय येथे संपन्न होणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पूर्व मुखी वहात असून या नदी पात्रातील वाळू हे गौण खनिज काढण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे.सरकारने व उच्च न्यायालयाचे प्रतिबंध करूनही उपयोग झालेला नाही.तथापि महसूल विभागाने वेळोवेळी अनेक ठिकाणी कारवाई करत ट्रॅक्टर,ट्रक,डंपर,आदी अनेक वहाने जप्त केली आहेत.मात्र वाहन मालकांनी दंडाची रक्कम न भरल्याने हा लिलाव होता आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पूर्व मुखी वहात असून या नदी पात्रातील वाळू हे गौण खनिज काढण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे.सरकारने व उच्च न्यायालयाचे प्रतिबंध करूनही उपयोग झालेला नाही.तथापि महसूल विभागाने वेळोवेळी अनेक ठिकाणी कारवाई करत ट्रॅक्टर,ट्रक,डंपर,आदी अनेक वहाने जप्त केली आहेत.या वहान मालकांना तहसील कार्यालयाने वेळोवेळी दंड केला असून ते भरण्यास बजावले आहे.मात्र या वाहतूक दारांनी तो दंड सरकार जमा केलेला नाही.त्यामुळे या दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी महसूल विभागाने हि वहाने थेट लिलावात उभे करून हि रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.या वाहनांचा लिलाव तहसील कार्यालयात कोपरगाव येथे कार्यालयीन वेळेत दि.०२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.तरी ज्या इच्छुकांना या लिलावात भाग घ्यायचा असेल त्यांनी तहसील कार्यालयात अटी,शर्ती,लिलावात असलेली वाहने,लिलावातील हातची किंमत आदी बाबत वरील वेळेत हजर राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शेवटी केली आहे.