गुन्हे विषयक
कारची दुचाकीस धडक,चांदेकसारे नजीक एक ठार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-संगमनेर या रस्त्याचा भाग असलेल्या चांदेकसारे शिवारात नुकताच एक अज्ञात कारने दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकी (क्रं.एम.एच.१७ ई.६८३८) वरील स्वार अन्वर अब्बास पठाण (वय-३२) हे गंभीर जखमी होऊन उपचार सुरु असताना मयत झाल्याची फिर्याद भाऊसाहेब बळीराम पवार (वय-५५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
झगडेफाटा ते पुणतांबा फाटा हा मार्ग आता मुंबई-नागपूर महामार्गाचा भाग झाला आहे.मात्र तो वैजापूरकडे जाताना मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला आहे.त्यामुळे या मार्गावरून वाहतूक अन्यत्र वळालेली आहे.इतरही या मार्गावरून विशेषतः कोपरगाव कडून संगमनेर कडे जाणाऱ्या वाहनांचा जास्त भरणा असतो.सध्या झगडेफाटा ते पुणतांबा मार्गाचे भूपृष्ठाचे डाँबरीकरण नुकतेच झालेले आहे.त्यामुळे या मार्गावरून वहाने भरधाव वेगाने जात असतात.त्यामुळे या मार्गावर अपघात वाढले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”झगडेफाटा ते पुणतांबा फाटा हा मार्ग आता मुंबई-नागपूर महामार्गाचा भाग झाला आहे.मात्र तो वैजापूरकडे जाताना मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला आहे.त्यामुळे या मार्गावरून वाहतूक अन्यत्र वळालेली आहे.इतरही या मार्गावरून विशेषतः कोपरगाव कडून संगमनेर कडे जाणाऱ्या वाहनांचा जास्त भरणा असतो.सध्या झगडेफाटा ते पुणतांबा मार्गाचे भूपृष्ठाचे डाँबरीकरण नुकतेच झालेले आहे.त्यामुळे या मार्गावरून वहाने भरधाव वेगाने जात असतात.त्यामुळे या मार्गावर अपघात वाढले आहे.अशीच घटना चांदेकसारे शिवारात दि.३१ जानेवारी रोजी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या कार ने वरील क्रमांकाच्या दुचाकिस धडक दिल्याने त्यावरील फिर्यादी भाऊसाहेब बळीराम पवार हे जखमी झाले आहे.तर अन्य एक स्वार अन्वर पठाण हे जखमी झाले आहे.त्याना नजीकच्या नागरिकांनी शिर्डी येथील साई संस्थानच्या रुग्णालयात भरती केले असता उपचाहर सुरु असताना त्यांचे निधन झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी भाऊसाहेब पवार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.६२/२०२१ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३८,४२७ मोटार वहान कायदा कलम १८४ १३४(अ),१३४(ब) प्रमाणे अज्ञात वहान चालक याचे विरुद्ध दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे हे करीत आहेत.